नेवाडेच्या उपसरपंचपदी किशोर पवार बिनविरोध

शिंदखेडा (प्रतिनिधी) : तालुक्यातील नेवाडे गाव येथे उपसरपंच पदाची निवड मंगळवार (दि.१६) रोजी पार पडली. यात उपसरपंचपदी किशोर बाबुलाल पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. माजी उपसरपंच शालिकराम महाले यांचा कार्यकाळ संपत आल्याने ही निवड करण्यात आली.

नवनियुक्त उपसरपंच किशोर पवार यांचा सत्कार शिवसेनेचे धुळे ग्रामीणचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांच्या हस्ते पुष्पहार व शाल देऊन करण्यात आला. याप्रसंगी नेवाडेचे सरपंच लक्ष्मीकांत साळुंके, ग्रामसेवक एन.बी.देवरे, माजी उपसरपंच शालिकराम महाले, ग्रा.पं. सदस्य भुषण साळुंके, ॲड.वसंत पवार, प्रशांत साळुंके, रंगराव पवार, किशोर ढोमण पवार, भाईदास साळुंके, मुनीर पिंजारी, ग्रा.पं. शिपाई ज्ञानेश्वर पवार आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here