पुणे (उपसंपादक वासंती देवळे) : मराठी अभिनेता अनिकेत विश्वासराव याच्याविरुद्ध त्याच्या पत्नीने मानसिक व शारीरीक छळ केल्याची फिर्याद दिली आहे. यामुळे मराठी सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली असून, याप्रकरणी स्नेहा अनिकेत विश्वासराव (वय २९, रा. करिष्मा सोसायटी, कर्वे रोड) यांनी फिर्याद दिली आहे.
करियरमध्ये आपल्यापेक्षा पत्नीचे नाव मोठे होईल या भितीने जीवे मारण्याची धमकी देऊन गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हाताने मारहाण करुन लोकांसमोर अपमानास्पद वागणूक देऊन अतोनात छळ केल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे. अनिकेत विश्वासराव याच्याबरोबर त्याच्या आईवडिलांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिकेत विश्वासराव आणि स्रेहा चव्हाण यांचा २०१८ मध्ये विवाह झाला आहे. स्रेहा चव्हाण यांनी मालिका तसेच चित्रपटात काम केले आहे.
अनिकेत विश्वासराव हा मुळचा मुंबईचा आहे़ गेल्या काही दिवसांपासून स्नेहा व अनिकेत यांच्यात वाद होत होता. स्रेहा हिने अलंकार पोलीस ठाण्यात मानसिक व शारीरीक छळ केल्याची फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.अनिकेत यांच्यासह चंद्रशेखर रघुनाथ विश्वासराव आणि अदिती चंद्रशेखर विश्वासराव यांच्या विरुद्ध देखील अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






