८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण हेच माझे धोरण – प्रा.पी.एम.पाटील

धरणगाव (योगेश पी.पाटील) – काल (दि.९) धरणगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष व शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा.पी.एम.पाटील यांचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने त्यांच्यावर समाजातील सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव झाला होता.
या शुभेच्छांचा स्वीकार करुन, त्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले आहे. याप्रसंगी बुलंद पोलीस टाइम्सच्या प्रतिनिधीशी बोलतांना त्यांनी सांगितले की, माझ्या वाढदिवसानिमित्त शिवसेना पक्षाचे सर्व जिल्हा व जिल्ह्यातील,तालुक्यातील पदाधिकारी,सर्व पक्षाचे राजकीय नेते,कार्यकर्ते,ग्रंथालय सेनेचे पदाधिकारी,दिव्यांगसेनेचे(अपंग) पदाधिकारी,नातेवाईक,मित्रमंडळी,माझ्यावर प्रेम करणारे सर्व पत्रकार,समाजसेवक यांनी मला तोंड भरून वाढदिवसाच्या निमित्त शुभेच्छा दिल्यात त्या सर्वांचा मी ऋणी आहे. असेच प्रेम आपण माझ्यावर ठेवा. ध.न.पा च्या१५० वर्षाच्या ऐतिहासिक नगरपालिकेत अपक्ष निवडणुन येऊन तुम्हा सर्वांच्या सहकार्याने नगराध्यक्ष पद मिळाले होते.
त्यावेळेस मी एकच विचार केला होता आपण असे काही काम करावे की ते जनतेच्या स्मरणात राहील आणि मी त्यावेळेस धरणगाव येथील सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न शुद्ध पाणी पिण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्र केल परवानगी आणि त्या कामात मला यश आले फिल्टर प्लॅन मी नगराध्यक्ष माझ्या सहीनिशी मंत्रालयात दाखल झाला व तो मंजुरी साठी पाणी पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत बैठकीत मी हजर असताना मंजुरीचे आदेश मिळाले त्याची नोंद महाराष्ट्र शासनाच्या दप्तरी झाली याचे मला समाधान आहे तसेच मार्केट कमिटी समोरिल जागा महाराष्ट्र शासनाच्या नावावर होती ती.
न.पा च्या नावावर करून एक उत्कृष्ट असे अमरधाम स्मशानभूमी त्या ठिकाणी तयार झाले महत्त्वाचे कामे नगराध्यक्ष असताना मी माझे सहकारी माझे नेते पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील,जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ व त्यावेळेचे सर्व नगरसेवक यांच्या सहकार्याने केले याचा मला अभिमान आहे.
या १५० वर्ष ऐतिहासिक न.पा नगराध्यक्ष म्हणून मराठा समाजाचे नेतृत्व करण्याचा पहिला बहुमानही मिळाला. मी ही इतरांप्रमाणे स्वप्न पाहत असतो परंतु मी स्वप्न पाहतांना घरात राहून झोपडपट्टीत राहणारे,बेघर रंजले गांजले त्यांच्याकडे पाहून स्वप्न पाहतो दिव्यगानकडे (अपंगाकडे) पाहुन स्वप्न पाहतो आपल्याला तरी राहायला घर आहे दोन वेळेच चांगले जेवायला मिळते,दोन हात, दोन पाय, दोन डोळे ,आहेत चांगले बोलता येते. जगात असे करोडो व्यक्ती आहेत त्यांना दोन वेळेचे जेवण सुद्धा मिळत नाही राहायला घर नाही अनेक दिव्यांग बांधव आहेत, डोळ्यांनी दिसत नाही,कानाने ऐकू येत नाही, पायाने चालता येत नाही, हाताने काम करता येत नाही,ते कसे जीवन जगत असतील यांचा विचार करून त्यांचा पेक्षातर आपण खूपच सुखी आहोत त्यामुळे८०%सामजसेवा व २०% राजकारण या उद्देशाने मी नेहमी कार्य करीत असतो मी तर ज्यांनी मला शुभेच्छा दिल्या त्यांना तर हेच सांगेल जे का रंजले गाजले त्याशी म्हणे जो आपुले तोच साधू ओळखावा देव तोच मानावा.रंजले, गांजलेल्या नेहमी मदत करा.आपल्याने जेवढे शक्य होईल तेवढी मदत त्यांना करा त्यातच खरे समाधान आहे.
कोरोना या विषाणुवर मात करण्यासाठी राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या नियमाचे पालन करा व इतरांनाही सांगा सुखी राहा समाधानी राहा निरोगी रहा.ज्यांनी ज्यांनी शुभेच्छा दिल्या व ज्यांना वेळ मिळाला नसेल अशा सर्वांचे पी.एम.पाटील मनःपूर्वक आभार मानतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here