माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींना कोराना

नवी दिल्ली – कोरोना विषाणूनं देशात अक्षरश: थैमान घातले आहे. दिवसागणिक कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असून यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली होती.ते अद्यापही रुग्णालयातच आहेत.
दरम्यान, आज (दि.१०) देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. त्यांनी खुद्द ट्विटरच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती दिली. आठवड्याभरात संपर्कात आलेल्या लोकांनी स्वत:ला विलगीकरण करुन घ्यावे तसेच आपली चाचणी करुन घ्यावी, असा उल्लेख त्यांनी ट्विटमध्ये केलाय. काँग्रेसचे दिग्गज नेते राहिलेले 84 वर्षीय प्रणव मुखर्जी यांनी 2012 ते 2017 या कार्यकाळात देशाचे राष्ट्रपतीपद भूषवले होते. 2019 मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here