भरारी फाऊंडेशनचे कोविड केअर सेंटरमधील 6 रुग्ण कोरोमुक्त होऊन आपल्या घरी परतले

जळगाव (निलेश पाटील) – भरारी फाउंडेशनच्या तज्ञ डॉक्टर्स, सेवाभावी स्वयंसेवक यांच्या सच्छिल सेवेमुळे एकूण आजपर्यंत 26 रुग्ण यशस्वी उपचार घेऊन पूर्णपणे बरे होऊन आपल्या घरी परतले. त्यांच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का मारून फुलांच्या वर्षावात त्यांना निरोप देण्यात आला. त्यावेळी डॉ स्वप्नील पाटील,डॉ केतन पाटील, डॉ लक्षमनसिंग राजपूत व नर्सेस उपस्थित होते.भरारी फाउंडेशनचे सचिन महाजन, आकाश धनगर, दीपक परदेशी, मोहित पाटील, देवराज बोरसे बाळू परदेशी उपस्थित होते. भरारी फाऊंडेशन या बहुउद्देशीय संस्थेने छत्रपती संभाजीराजे नाट्यसंकुल येथे 50 खाटांचे सी सी सी सेंटर सुरू केले आहे. या ठिकाणी रुग्णांची घरासारखी पण पूर्णतः वैद्यकीय सल्ल्यानुसार काळजी घेणे सुरू आहे.
आरोग्यसोबतच त्यांच्या मनालाही उभारी मिळावी यासाठी अनेक मोटिवेशनल स्पीकर्स तसेच मनोरंजन क्षेत्रातील मान्यवर या सेंटरला भेट देऊन जात असतात. नाट्य समीक्षक व सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटील, आणि मोटिवेशनल स्पीकर रामचंद्र पाटील, जयदीप पाटील, गिरीष कुलकर्णी यांनी भेट देऊन रुग्णांचे स्वतंत्र सेशन घेतले.निसर्गोउपचार तज्ञ अनंत महाजन हे रोज सकाळी 8 ते 8:30 या कालावधीत रुग्णांचा अर्धा तास योग वर्ग घेऊन त्यांची प्रतिकारक्षमता वाढवीत आहेत.
रोज विविध विषयांवरचे वक्ते व भरारी फाउंडेशनचे पालक रजनिकांतकाका कोठारी, केशवस्मुर्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरतदादा अमळकर, जैन उदयोग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन, अनिषभाई शहा, नंदूभाऊ आडवाणी, अनिलजी भोकरे सर, डॉ.राजेश पाटील सर, सपनभाऊ झुनझुनवाला, सुशीलभाऊ नवाल, सुनीलभाऊ झंवर, आदेशजी ललवाणी, अनिलजी कांकरिया, सभापती सुचिताताई हाडा,रवींद्रजी लढा, नरेशजी खंडेलवाल, अमरसेठ कुकरेजा, डॉ.राधेश्याम चौधरी व अजिंक्य देसाई हे मान्यवर आपले अनमोल मार्गदर्शन व सहकार्य करीत आहेत. भरारी फाउंडेशनचे कार्यकर्ते यासाठी परिश्रम घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here