गुप्तांगात आग लावून अल्पवयीन मुलीने केला महिलेचा खून

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : येथे एका अल्पवयीन मुलीने महिलेचा खून केला असून, खून केल्यानंतर या मुलीने महिलेच्या गुप्तांगात आग लावली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलीला अटक केली आहे.

१५ नोव्हेंबर रोजी दिल्ली पोलिसांना एका महिलेचा मृतदेह आढळला. पोलिसांनी या प्रकरणी तपास केला असता, सीसीटीव्हीमध्ये एक अल्पवयीन मुलगी मृतदेहाची विल्हेवाट लावत असल्याचे दिसले. पोलिसांनी या प्रकरणी कसून तपास केल्यानंतर मुलीचा ठावठिकाणा लागला आणि तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान मुलीने धक्कादायक खुलासा केला. या मुलीचे आणि महिलेचे विवाहबाह्य संबंध होते. परंतु गेल्या काही दिवसांत दोघींमध्ये खटके उडाले होते. दोघींमध्ये खूप वाद झाले होते. १५ नोव्हेंबर रोजी मुलीने महिलेला आपल्या घरी बोलवले. त्यानंतर मुलीने महिलेच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण केली, त्यात महिलेचा मृत्यू झाला. नंतर मुलीने महिलेच्या गुप्तांगात आग लावली. महिलेचा मृतदेह गाडीत टाकून त्याची विल्हेवाट लावली. पोलिसांनी या प्रकरणी मुलीला अटक केली असून पुढील चौकशी सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here