पुणे जिल्ह्यातील बेल्हे शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षावर प्राणघातक हल्ला

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : जिल्ह्यातील बेल्हे येथे शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ तुकाराम चाटे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.१९) सकाळी घडली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घरगुती की राजकीय वैमनस्यातून हा प्रकार घडाला याचा शोध पोलीस घेत आहेत.

याप्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात चाटे यांचे चुलत भाऊ साहेबराव धनंजय चाटे यांच्यासह दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी एकनाथ चाटे हे दुचाकीवरुन आळेफाटा येथील काम उरकून बेल्हे येथे घरी जात होते.

त्यावेळी त्यांचे चुलत भाऊ साहेबराव चाटे याने त्यांचा पाठलाग केला. राजुरीच्या पुढे आल्यानंतर स्वामी कृपा लॉन्स मंगल कार्यालय समोरील हायवे रोड कडे जात असताना अचानक त्यांच्या डोक्यात पाठीमागील बाजूस जोरात लोखंडी रॉडने मारले. त्यामुळे ते दुचाकीवरुन जमिनीवर पडले. त्यावेळी त्यांना चुलत भाऊ साहेबराव सोबत दोन अनोळखी इसम हातात लोखंडी रॉड घेऊन उभे असल्याचे दिसले.

या घटनेत ते गंभीर जखमी होऊन जागेवरच बेशुद्ध झाले. त्यांना आळेफाटा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांत्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. एकनाथ चाटे यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी चुलत भाऊ आणि दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here