पनवेल (प्रतिनिधी सुनिल राठोड) : रसायनी परिसरात महिलेवर अत्याचार केल्याची घटना घडली असून फिर्यादी महिलेने रसायनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
रसायनी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी राजेश बाळाराम कुरंगळे (वय ३० वर्ष राहणार सावळे) याच्यासह त्याचे चार साथीदार स्वप्नील माणिक जोशी, (वय ३२ वर्ष राहणार खाने आंबिवली), निलेश सुरेश माटल (रा. गुलंसूदे वय २१ वर्ष), भरत नामदेव जांभळे (वय ३३ वर्ष चांभार्ली), आश्विन जाधव यांवर गुन्हा दाखल केला असून फिर्यादी महिलेला आरोपी राजेश बाळाराम कुरंगळे यांने तुझे अश्लील व्हिडिओ व्हायरल करेल अशी धमकी देत वारंवार शारीरिक संबंध केला.
फिर्यादी महिलेस पंधरा दिवस गुळसुंदे येथील घरामध्ये कोंडून ठेवून इतर आरोपी साथीदारांनी यांनी अपरहरण करण्यास मदत केल्याचे महिलेने सांगितले आहे. हा गुन्हा पराडे येथील राजेश बाळाराम कुरंगळे यांच्या ऑफिस मध्ये घडला असून भा. द. वि.स ३७६, ३६३, ३४१, ५०६, ३४ या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून उपविभागीय अधिकारी संजय शुक्ला, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास डोंगरे, पोलीस निरीक्षक गुंड यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. बालवडकर हे अधिक तपास करीत आहेत.






