पुणे (पश्चिम महाराष्ट्र उपसंपादक सदानंद काळे) : मंतरवाडी कात्रज बायपास हायवेवर लुटमार करणाऱया आरोपींना जेरबंद करून पाच गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे ३१/१०/२०२१ रोजी खडी मशिन चौक (कोंढवा) येथे रात्रीचे वेळी मोटर सायकलवरुन जाणारे दिनेश जितलाल यादव (वय ३२ वर्षे रा. गल्ली नं. २. टिळेकर नगर, कोंढवा पुणे) यांना मोटर सायकल वरुन आलेल्या तिघांनी तलवारी सारख्या हत्यारानी धाक दाखवून त्याचे खिशातील दोन मोबाईल फोन व रोख रक्कम १०,००० रुपये जबरदस्तीने चोरुन नेले होते. याबाबत गुन्हा नोंद आहे. त्यामुळे सदरचे गंभीर गुन्हे उघडकीस आणणेबाबत वरिष्ठांनी आदेशीत केलेले होते.
युनिट -०५, गुन्हे शाखेचे पथकांनी गुन्हे घडलेल्या ठिकाणांपासुन सतत मंतरवाडी ते कात्रज बाय पास हा भागात पेट्रोलींग केली. तसेच पोलिस अमंलदार विनोद शिवले, अकबर शेख व महेश वाघमारे यांना मिळालेल्या बातमी वरुन व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे १) प्रफुल भारत कांबळे (वय २१ वर्षे रा. ग.नं. २, ससाणेनगर वाईन शॉप शेजारी, हडपसर पुणे), २) परवेज हैदरअली इनामदार (वय २० वर्षे रा. आदर्शनगर, तिरंगा चौक, ७ नं. गल्ली,काळेपडळ, हडपसर पुणे), ३) विजय बाळु सोनवणे (वय २२ वर्षे रा. आदर्श नगर, तिरंगा चौक, दर्याशेजारी,जे.एस.पी.एम. कॉलेजचे मागे, हडपसर पुणे) यांना चोरीचे होंडा शाईन मोटर सायकल सह पकडुन त्यांना गुन्हयात अटक केली.
कौशल्यपुर्ण तपास केला असता आरोपी परवेज हैदरअली इनामदार, विजय बाळु सोनवणे व एक विधी संर्घर्षित बालक यांनी चोरीचे मोटर सायकलचा वापर करुन कात्रज बायपास रोडवर रात्रीचे वेळी मोटर सायकलवरुन जाणाऱयांना कोयत्याचा धाक दाखवून खिशातून मोबाईल फोन व रोख रक्कम जबरदस्तीने काढून जबरी चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. आरोपी यांचेकडुन ३५,०००/- रु कि.ची होंडा शाईन मोटर सायकल, व ६२,०००/- रु कि.चे ५ महागडे मोबाईल जप्त करणेत आले आहेत. त्यांच्याकडून हडपसर पोलिस स्टेशन गु.र.नं. १००४/२०२० भा.द.वि.कलम ३७९,३४, लोणी काळभोर पो.स्टे.गु.र.नं.६११/२०२१भा.द.वि.कलम ३९२,३४, हडपसर पोलिस स्टेशन गु.र.नं. १००६/२०२१ भा.द.वि.कलम ३९२,३४१,५०६(१), ३४, लोणीकाळभोर पोलिस स्टेशन गु.र.नं. ६१२/२०२१ भा.द.वि. कलम ३९२,३४, कोंढवा पो.स्टे.गु.र.नं. ९५१/२०२१ भा.द.वि.कलम ३९४,३४२,३४ हे गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलिस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलिस आयुक्त, गुन्हे रामनाथ पोकळे, पोलिस उप-आयुक्त, श्रीनिवास घाडगे, सहायक पोलिस आयुक्त,श्री.लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक, हेमंत पाटील, सहायक पोलिस निरीक्षक, प्रसाद लोणारे, पोलिस उप-निरीक्षक, सोमनाथ शेंडगे, पोलिस अमंलदार रमेश साबळे, दया शेगर, महेश वाघमारे, प्रमोद टिळेकर, विनोद शिवले, अकबर शेख, आश्रुबा मोराळे, चेतन चव्हाण, दिपक लांडगे, विशाल भिलारे, विलास खंदारे, पृथ्वीराज पांडोळे, प्रविण काळभोर, दाऊद सय्यद, अजय गायकवाड, दत्ता ठोंबरे, अमर उगले, संजयकुमार दळवी, स्नेहल जाधव, स्वाती गावडे यांनी केलेली आहे.






