धाराशिव संचलित वसाकाचा गाळप हंगाम सुरू

नाशिक (विशेष प्रतिनिधी इंजि.कुबेर जाधव) : कसमादेचे वैभव असलेल्या वसाका चा ३६ वा गाळप हंगाम शुभारंभ धाराशिव उद्योग समूहाचे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी कारखान्याचे कर्मचारी श्री व सौ, देविदास शेवाळे, हिरामन देवरे यांच्या हस्ते सपत्नीक गव्हान व काटा पुजन करण्यात आले.

यावेळी कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी सांगितले की मी आपल्या ला दीलेल्या शद्धाला बांधील असुन , कामगारांच्या थकीत देणी , संदर्भात करारात ठरल्याप्रमाणे मी कटीबद्ध आहे , त्यासाठी सर्वच जुन्या व नव्या कामगारांची मोलाची साथ अपेक्षित आहे ज्या प्रमाणे तुम्ही माझ्या कडून अपेक्षा करता त्याच बरोबर तुमच्या कडून ही तिच अपेक्षा मी तुमच्या कडून करतो आहे , यावेळी कारखान्याचे जेष्ट कर्मचारी व उस उत्पादक श्री कुबेर जाधव यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की धाराशिव उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि संचालकांनी ,शेतकी अधिकारी यांना बरोबर घेऊन उस लागवड व पुरवठा व्हावा म्हणून दौरा करून सभासदांचा विस्वास संपादन करण्याची गरज असल्याचे मत मांडले असता अध्यक्ष अभिजित पाटील यांनी कुबेर जाधव यांनी केलेल्या विनंती चां नक्कीच सकारात्मक विचार करुन लवकरच संचालक व माण्यवरा सोबत कार्यक्षेत्रात जाऊन सभासदांशी संवाद साधला जाईल असे सांगितले

vasantrao-sahkari-sugar-factory

 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव यांनी एकरकमी एफ आर पी संदर्भात अध्यक्ष अभिजित पाटील यांना विचारणा करुन ती एकरकमी एका टप्प्यात देण्याची विनंती केली असता अध्यक्ष अभिजित पाटील यांनी तात्काळ मागणी मान्य करून ,उस गाळपास आल्यावर १५ जीवनाच्या अंतारावर देण्याचे जाहीर केले ,

यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री अमर पाटील,जेष्ट संचालक अभासाहेब खारे, संदीप खारे, सुरेश सावंत, संजय खरात, नितीन बरडे, जेष्ठ सभासद कुंदन बापू चव्हाण , नितीन सरडे ,लोहोणेर येथिल प्रगती शिल शेतकरी प्रसाद देशमुख , योगेश पवार , युनियनचे अध्यक्ष अशोक देवरे कार्याध्यक्ष कुबेर जाधव युनियनचे सर्व पदाधिकारी , कारखान्याचे जनरल मॅनेजर पठाण, चिप इंजिनिअर शेलार चिप केमिस्ट् सुर्यवंशी, कोजन इन्चार्ज संतोष कचोर,शेतकी अधिकारी शिंदे , सुरक्षा अधिकारी किरण आहीरे यांच्या सह सर्व कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुबेर जाधव यांनी केले तर प्रास्ताविक श्री आबासाहेब खारे यांनी मानले सर्व सर्व उपिस्थिताचे आभार कार्यकारी संचालक श्री अमर पाटील यांनी मानले ,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here