सासऱ्याचा खून करून फरार झालेला जावई LCB कडून जेरबंद

पुणे (नारायण शेळके) – आज दिनांक 10/8/2020 रोजी पुणे ग्रामीण जिल्ह्याचे हद्दीत पुणे ते सोलापूर रोडने LCB पथक पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीवरून जेजुरी पोस्टे गुरनं 291/2020 भादवि क. 302 अन्वये गुन्हा दि 8/8/2020 रोजी घडला व दि 9/9/2020 दाखल असून सदर गुन्ह्यातील निष्पन्न आरोपी नामे सुरेश सदाशिव भोसले वय 40 वर्षे रा मिरवडी ता. दौंड जि. पुणे याने आपले बायकोच्या माहेरी मौजे नाझरे-सुपे ता. पुरंदर जि.पुणे येथे जाऊन बायको आपल्याकडे नांदायला येत नाही म्हणून चिडून जाऊन भांडण करून त्याचे पत्नीचे वडील मयत नामे किसन देशा काळे वय 60 वर्षे यास चाकूने हल्ला करून गंभीर जखमी करून जीवे ठार मारून पळून गेला होता आज दिनांक 10/08/2020 रोजी त्यास मौजे मिरवडी ता. दौंड येथून सापळा रचून शिताफीने त्यास ताब्यात घेऊन अधिकची चौकशी केली असता त्यानेच गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्यास पुढील तपासकामी वैद्यकीय तपासणी करून जेजुरी पो स्टे च्या ताब्यात दिले आहे. सदरची कारवाई ही स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि रामेश्वर धोंडगे, अमोल गोरे,सफौ.दत्तात्रय जगताप , श्रीकांत माळी,चापोहवा राजापूरे,पोना विजय कांचन ,पोशि धिरज जाधव, अमोल शेडगे, मंगेश भगत ,बाळासाहेब खडके यांनी केली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here