चोपडा (संदीप ओली) – शहरातील पंकज विद्यालयातील कु.अनुष्का श्रीकांत जाधव हीने 10 वी शालांत परीक्षेत मागासवर्गीयांमधून चोपडा तालुक्यात प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे.तिला प्राविण्यासह 94% गुण मिळाले आहेत.
शहरातील एस.के.नगर येथील रहिवासी नूतन ज्ञान मंदिर,अडावद येथील शिक्षक श्री.श्रीकांत जाधव व प्रताप विद्या मंदिर,चोपडा येथील शिक्षिका सौ.संपदा जाधव यांची कन्या कु.अनुष्का हिचे पंकज विद्यालयातील शिक्षकवृंद,भारतीय पत्रकार महासंघाचे तालुकाध्यक्ष छोटुभाऊ वारडे यांनी अभिनंदनपर सत्कार केला व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.तसेच एस.के.नगर कॉलनी परिसरातील नागरिकांनी अभिनंदनपर कौतुक केले आहे.प्राविण्यासह गुण प्राप्त करुन तालुक्यात मागासवर्गीयांमधुन प्रथम आलेल्या कु.अनुष्का हिचे स्वप्न डॉक्टर होण्याचे आहे.व आपल्या शिक्षणाचा फायदा गोरगरीब जनतेला व्हावा.असे मत तिने व्यक्त केले.







