शिक्षकांच्या वेतनाचा घोळ संपविण्याची शिक्षण समन्वय समितीची मागणी

नागपुर (मनोज बाचले) – ऑगस्ट महिन्याचा दुसरा आठवडा सुरू होऊनही शिक्षकांचे जुलै महिन्याचे वेतन झाले नसल्याने शिक्षक आर्थिक अडचणीत आल्याची जाणिव आज शिक्षण समन्वय समितीच्या वतीने माध्यमिक शिक्षणाधिकारी पटवे यांची भेट घेऊन करून देण्यात आली.
यावेळी शिक्षणाधिकाऱ्यांनी वेतन पथक अधीक्षक पाटील व वाघमारे यांच्यासमक्ष चर्चा घडवून आणली. यात वेतन अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार कोषागार कार्यालयाने जुलै महिन्याच्या वेतन संदर्भात जे अधिसंख्य पदाबाबत माहिती मागितली व आक्षेप घेतले त्या आक्षेप ची पूर्तता आजच वेतन पथक कार्यालय कडून पूर्ण करून देयक मंजुरीसाठी कोषागार कार्यालयात सादरकरण्यात येईल असे सांगितले. त्यामुळे या आठवड्याच्या गुरुवार पर्यंत वेतन करण्याचे प्रयत्न आहे असे आश्वासन शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले. तसेच पुढील महिन्यापासून 1 तारखेला वेतन झाले पाहिजे म्हणून समितीच्या प्रतिनिधींनी आग्रह धरून मागणी केली व मार्च महिन्यात झालेली 25% वेतन कपात याच महिन्यात मिळली पाहिजे अशी मागणी समन्वयन समितीच्या वतीने करण्यात आली. तेव्हा दोन्ही मागण्या मान्य करण्याचे आश्वासन शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले. उपरोक्त मागण्या पूर्ण न झाल्यास शिक्षण समन्वय समिती तीव्र आंदोलन करणार अशी भूमिका समिती नी मांडली.
याप्रसंगी सर्वश्री अनिल गोतमारे, अशोक गव्हाणकर, पुरुषोत्तम पंचभाई, दिलीप तडस, नामा जाधव, बाळा आगलावे, सपन नेहरोत्रा , विठ्ठल जूनघरे, अरविंद शेंडे, गजानन भोरड, धनराज राऊत, अभिजित पोटले, पृथ्वीराज चव्हाण, विजय काळे व इतर प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here