बहुजन क्रांती मोर्चा ,धरणगांव चा अनोखा उपक्रम; कोरोना योद्धांच्या हस्ते गुणवंतांचा गुणगौरव

धरणगांव (योगेश पी.पाटील) – सोमवार (दि.१०) बहुजन क्रांती मोर्चा , धरणगांव च्या वतीने धरणगांव शहरातील कोरोना योद्धा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला.
या अनोख्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धरणगांव नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेशभाऊ चौधरी होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रांत अधिकारी – एरंडोल विनयजी गोसावी , तहसिलदार – धरणगाव नितीनकुमार देवरे , आदर्श नायब तहसिलदार प्रथमेश मोहोळ , तालुका वैद्यकीय अधिकारी सोनवणे साहेब , मंडळ अधिकारी वनराज पाटील , तलाठी अनिल सुरवाडे , साहित्यिक डॉ. संजीवकुमार सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. विशेष निमंत्रित मान्यवरांमध्ये साहित्यिक व देशदूतचे पत्रकार बी. एन. चौधरी , पुण्यनगरीचे धर्मराज मोरे , दिव्य मराठीचे बी. आर. महाजन व कल्पेश महाजन , सकाळचे डी. एस. पाटील , लोकमतचे शरदकुमार बन्सी , पुण्यनगरीचे जितेंद्र महाजन , लोकशाहीचे भरतभाऊ चौधरी व विनोद रोकडे , लाईव्ह ट्रेंड न्यूजचे विजय वाघमारे , तरुण भारतचे कडू महाजन , लोकपत्रिका न्यूजचे संदीप चव्हाण ,साईमतचे हाजी इब्राहीम , बुलंद पोलीस टाईम्सचे योगेश पी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथींच्या हस्ते बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज , सत्यशोधक – राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले , राजर्षी छत्रपती शाहु महाराज , विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला कोरोना काळात आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र काम करणाऱ्या कोरोना योध्दा म्हणून सन्मान करण्यात आला. यात प्रामुख्याने महसूल प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी , पत्रकार बांधव , न. पा. कर्मचारी , आरोग्य विभागातील कर्मचारी , पोलीस प्रशासन , महावितरण चे कर्मचारी , शिक्षण क्षेत्रातील कर्मचारी , पोस्ट खाते आदींचा समावेश होता. या सर्व मान्यवरांना कोरोना योध्दा सन्मानपत्र व अनमोल ग्रंथ भेट स्वरूप देण्यात आले. नुकतीच ज्यांना पीएचडी मिळाली असे प्रा.रजनीकांत वाघ यांचा विशेष सत्कार करण्यात आला तसेच धरणगाव शहरातील एस. एस. सी. परीक्षेतील गुणवंत – यशवंत विद्यार्थी – विद्यार्थिनींचा प्रशस्तीपत्रक व अनमोल ग्रंथ देऊन सत्कार आणि गुणगौरव करण्यात आला. या सर्व सत्कारार्थी मान्यवरांना गुलाबपुष्प न देता राष्ट्रमाता जिजाऊ , छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती संभाजी महाराज , राजमाता अहिल्यामाई होळकर , राष्ट्रपिता महात्मा फुले यांचे गुलामगिरी , शेतकऱ्यांचा आसूड , शिवजयंतीचे खरे जनक , विद्येची महानायिका सावित्रीमाई फुले , राजर्षी शाहु महाराज , विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर , तुकाराम महाराज , अण्णाभाऊ साठे , राष्ट्रसंत गाडगे बाबा या महापुरूषांचे जीवनचरीत्र ग्रंथ स्वरूपात भेट देण्यात आले.
याप्रसंगी काही विद्यार्थांनी मनोगत व्यक्त करून सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. अतिथी मान्यवरांमध्ये धरणगावचे प्रसिद्ध साहित्यिक बी. एन. चौधरी यांनी गुणवंत मुलांचे कौतुक केले व आदर्श नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ साहेब यांच्या संघर्ष प्रवासावर कविता गायली. आदर्श नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ साहेबांनी आपला जीवनप्रवास सांगून विद्यार्थ्यांना प्रभावित केले. आई – वडील , गुरूजन , वडीलधारी मंडळीचा सन्मान करा व नम्रतेने वागा असा संदेश दिला. डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी विशेषतः बामसेफ व बहुजन क्रांती मोर्चा , धरणगांव आयोजित कार्यक्रमाची प्रशंसा केली. एरंडोलचे प्रांत अधिकारी विनयजी गोसावी यांनी मुलांना शिवराय – फुले – शाहु – आंबेडकरांचा खरा इतिहास जाणुन घ्या व मार्गक्रमण करा असा संदेश दिला.भविष्यात स्पर्धा परीक्षा देऊन मोठे अधिकारी बना !…. पुस्तकांवर प्रेम करा !…. स्व – अनुभवाचे दाखले देऊन सकारात्मक विचार करा , व्यक्तीमत्व चांगले ठेवा , सर्वात महत्वाचे म्हणजे ध्येय निश्चित करा… अशा विविध पैलुंवर गोसावी साहेबांनी बहुमोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष निलेशभाऊ चौधरी यांनी मुलांना खचून न जाता व्यापार – व्यवसाय – शिक्षण या माध्यमातुन मोठे व्हा !…. असा संदेश देऊन गुणवंताना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बामसेफचे तालुकाध्यक्ष पी. डी. पाटील व छत्रपती क्रांती सेना जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन बामसेफचे तालुका उपाध्यक्ष हेमंत माळी यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बहुजन क्रांती मोर्चाचे तालुका संयोजक राजेंद्र ( आबा ) वाघ , बामसेफचे तालुकाध्यक्ष पी. डी. पाटील , बामसेफचे तालुका उपाध्यक्ष हेमंत माळी , भारत मुक्ती मोर्चाचे राज्य – महासचिव मोहन शिंदे , छत्रपती क्रांती सेनेचे जळगांव जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील , कैलास पवार , व्ही. टी. माळी , किशोर पवार , आकाश बिवाल , प्रोटॉनचे सुनिल देशमुख , राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे सिराज कुरेशी , गौतम गजरे , विनोद बीजबीरे , सूरज वाघरे , नगर मोमीन आदींनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here