अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्यानंतर काढला व्हिडिओ

गया (बिहार) : येथे दहावीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. मानवतेला काळिमा फासणाऱ्या या घटनेने संपूर्ण गया हादरले. आरोपीने दुष्कृत्याचा व्हिडिओ तयार करून पीडितेला धमकावले. तिच्या बहिणीवर बलात्कार आणि भावाला जीवे मारण्याची धमकी आरोपींनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, गया जिल्ह्यातील दुर्गम भागातील गावात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून त्याचा व्हिडिओ काढला. त्यानंतर या घटनेबाबत कुणाला सांगितले तर बहिणीवर बलात्कार आणि भावाला जीवे मारण्याची धमकी दिली. मुलीने त्रासाला वैतागून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी स्थानिकांनी तिला वाचवले.

एका पोलीस अधिकाऱ्याच्या मुलानेच हे दुष्कृत्य केले होते. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर मित्रांना सांगून दुष्कृत्याचा व्हिडिओ तयार केला. आरोपीने पीडितेला धमकावले. या त्रासाला वैतागून मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला. पीडितेच्या कुटुंबीयांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस ठाण्यात गेल्यानंतर तक्रारदारांनाच धमकावण्यात आले. याबाबत कुठेही वाच्यता करू नका, असा दम त्यांना भरण्यात आला.

पीडितेने कुटुंबीयांना आपबीती सांगितली. गावातीलच तरूणाने तिच्यावर बलात्कार केला. त्याच्या अन्य मित्रांनी त्याचा व्हिडिओ तयार केला. कुटुंबीयांना याबाबत काही सांगितले तर, बहिणीसोबतही हेच घडेल, असे त्याने धमकावले. या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. गावाजवळील टेकडीवर जाताना पीडितेला स्थानिकांनी वाचवले. या घटनेची दखल वरिष्ठ पोलीस अधीक्षकांनी घेतली असून, या घटनेत सामील असलेल्या आरोपींविरोधात लवकरच कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here