मुंबई (प्रतिनिधी चेतन किर्दत) : युक्रेनहून बिझनेस व्हिसावर भारतात आलेल्या तरुणीचा बाराव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची बुधवारी अंधेरीच्या डी. एन. नगर परिसरात घडली. अहसेन दुब्येना असे या तरुणीचे नाव असून हा अपघात आहे, आत्महत्या आहे की अन्य काही याबाबत डी. एन. नगर पोलिस तपास करीत आहेत.
अहसेन ही दोन दिवसांपूर्वीच मुंबईत आली होती. ती अंधेरीच्या मिलेनियर हेरिटेज सोसायटीत पेयिंग गेस्ट म्हणून राहत होती. मंगळवारी रात्री उशिरा ती बाराव्या मजल्यावर मित्रांसोबतपार्टी करीत होती. पार्टीत सर्वांनी मद्यप्राशन केले होते. पहाटेच्या सुमारास अहसेन तोल जाऊन बाराव्या मजल्यावरून पडल्याची माहीती तिच्या मित्रांनी पोलिसांना दिली. डी. एन. नगर पोलिस घटनास्थळी पोहचले. अहसेनला कूपर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
डी. एन. नगर पोलिसांनी याप्रकरणी अपमृत्यूची नोंद करून याबाबतची माहीती युक्रेन दुतावासाला दिली. नेमके काय घडले हे जाणून घेण्यासाठी पोलिसांनी तिच्यासोबतच्या मित्रांना ताब्यात घेतले आहे.






