पाण्याच्या पाइपातून बाहेर पडू लागल्या पाचशेच्या नोटा; कनिष्ठ अभियंत्याची मालमत्ता पाहून पोलीसही चक्रावले

कलबुर्गी (कर्नाटक) : सरकारी नोकरीत काही काळाने पदोन्नती मिळतेच. पण काही जण पदोन्नती, बदली नको, म्हणून प्रयत्न करतात, पदोन्नतीमुळे आपल्यावर इतरांचे लक्ष राहते. जादा काम करावे लागते. ते बऱ्याच जणांना नको असते. येथे सार्वजनिक बांधकाम खात्यात ३० वर्षे कनिष्ठ अभियंता पदावर काम करणाऱ्या शांतनगौडा बिरादरच्या घरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा घातला, तेव्हा करोडो रुपयांची बेहिशेबी संपत्ती व मालमत्ता आढळली.

त्याच्या घरात मोठ्या प्रमाणात सोनं सापडलं. याशिवाय २५ लाखांची रोकडही जप्त करण्यात आली. छापा पडणार असल्याची माहिती बिरादरला आधीच मिळाली होती. त्यामुळे त्यानं बराचशी रोकड घराबाहेर असलेल्या पाईपांमध्ये लपवली होती. तनगौडा याने दोन मोठे बंगले बांधले, ३५ एकर जमीन विकत घेतली. मोठे फार्म हाऊस बांधले अन्य मालमत्तांची मोजदाद सुरू असून, बिरादरने घरात लपवलेले पैसे शोधताना कर्मचारी थकून गेले. त्यांना ४० लाख तर सहज सापडले. त्यातील १३ लाख रुपयांची रोकड तर भिंतीच्या पाइपात लपवली होती. आतमध्ये पाणी नव्हे तर नोटाच भरल्या होत्या. पाइप फोडताच नोटाच खाली पडू लागल्या. इप उघडण्यासाठी पोलिसांनी प्लंबरलाच बोलावून आणले होते. शांतनगौडा बिरादरने ३० वर्षांत दोनच जिल्ह्यांत काम केले.

कर्नाटक सरकारमधील भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात भ्रष्टाचारविरोधी विभागानं (एसीबी) कारवाई सुरू केली आहे. याच कारवाईचा भाग म्हणून एसीबीनं १५ अधिकाऱ्यांशी संबंधित ६० ठिकाणांवर एसीबीनं धाडी टाकल्या. विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या घरांवर टाकण्यात आलेल्या धाडींमधून प्रचंड मोठं घबाड एसीबीच्या हाती लागलं.

कर्नाटक सरकारच्या १५ अधिकाऱ्यांच्या मालमत्तांवर एसीबीनं छापे टाकले. या कारवाईत ८ एसपी, १०० अधिकारी आणि ३०० कर्मचाऱ्यांचा समावेश होता. एसीबीच्या पथकानं ६० ठिकाणांवर धाडी टाकल्या. या कारवाईदरम्यान साडे आठ किलोहून अधिक सोनं आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली. अधिकाऱ्यांच्या घरातून हस्तगत करण्यात आलेली संपत्ती पाहून एसीबीच्या पथकाचे डोळे विस्फारले.

कृषी विभागाचे संयुक्त संचालक टी. एस. रुद्रेशप्पा यांच्या घरातून ७ किलो सोनं ताब्यात घेण्यात आलं. त्याचं बाजारमूल्य ३.५ कोटी रुपये आहे. त्यांच्या घरात १५ लाखांची रोकड आढळून आली. वरिष्ठ मोटर निरीक्षक सदाशिव मारलिंगन्नावर यांच्या घरातून १.१३५ किलो सोनं जप्त करण्यात आलं. त्यांच्या घरात ८ लाख २२ हजार १७२ रुपयांची रोकड सापडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here