गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी भंगाळे गोल्डला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद

जळगाव (प्रतिनिधी भावेश ठाकूर) : भारतीय संस्कृतीत सोन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सोने खरेदी ही प्रत्येक कुटुंबाच्या जिव्हाळ्याचा विषय आणि या खरेदीसाठी खास मुहूर्तही आहेत. यातीलच एक खास मुहूर्त म्हणजे गुरुपुष्यामृत योग. या दिवशी लोक सर्व शुभकामे करत असतात. त्यातच या दिवशी सुवर्ण खरेदी केल्यास जीवन सुखमय होते, असे मानले जाते. त्यामुळे या मुहूर्ताला ग्राहकांची सुवर्ण खरेदीसाठी मोठी गर्दी असते. या गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर भंगाळे गोल्डमध्ये दागिने घडणावळीवर दिलेल्या ३० टक्के सवलतीमुळे ग्राहकांचा उदंड प्रतिसाद लाभला होता.

गुरुपुष्यामृत योग म्हणजेच गुरू पुष्यनक्षत्र योग. आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे हा योग सर्वांत शुभ योग म्हणून ओळखला जातो. गुरुपुष्यामृत हा योग पुष्य नक्षत्रासाहित गुरुवारी येतो. असा हा शुभ योग यंदा आज आला आहे. हा योग खूप महत्त्वाचा मानला जातो. या मुहूर्ताला आपण सर्व शुभ कार्याला सुरवात म्हणजेच प्रारंभ करतो. यात गृहप्रवेश, सोने व चांदी खरेदीला प्राधान्य दिले जाते.

ग्राहकांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता सोनेखरेदीस मनमुराद वेळ मिळावा म्हणून शोरुमचा चौथा मजला सुरु करण्यात आला असून, सोबतच नावीन्यपूर्ण दागिन्यांचे परंपरा हे प्रदर्शनसुध्दा आयोजित करण्यात आले आहे. तसेच बदलत्या फॅशनमुळे तरुणांचा वर्ग आता दागिन्यांकडे वळू लागला आहे. हा नवा हटके ट्रेन्ड लक्षात घेता आपल्या ग्राहकांना सातत्याने नावीन्यपूर्ण सेवा देणाऱ्या भंगाळे गोल्डनेही हा दागिन्यांचा मर्दानी बाणा जळगावात उपलब्ध करून दिला आहे.

विविधता, शुध्दता आणि पारदर्शी व्यवहार या त्रिसूत्रीवर नाव कमाविणाऱ्या भंगाळे गोल्डमध्ये खास पारंपारिक टच असणाऱ्या व नावीन्यपूर्ण डिझाईन्समध्ये उपलब्ध असणाऱ्या या दागिन्यांची खरेदी करताना घडणावळीवर ३० टक्के सूटीचा लाभ घेण्यासह परंपरा प्रदर्शनालाही ग्राहकांनी भेट द्यावी, असे आवाहन भंगाळे गोल्डचे संचालक भागवत भंगाळे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here