मुंबई (संपादक सुनिल पाटील) : शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या नवव्या स्मृतीदिना निमित्त साहेब प्रतिष्ठान गोराई या संस्थेद्वारे व्यंगचित्रंकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत रक्तदानाचे प्रणेते आणि रक्तपेढी विभागाचे तंत्रज्ञ आयोजक श्रीधर बूधाजी देवलकर यांना व्यंगचित्रकार म्हणून त्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
श्रीधर देवलकर यांना सलग दुसऱ्या वर्षी हा व्यंगचित्रकार म्हणून सन्मान मिळालेला आहे हे विशेष. श्री. देवलकर हे हरहुन्नरी कलाकार असून रक्तदानाच्या कार्य सोबत ते उत्तम क्रिकेट खेळाडू असून त्यांनी हल्लीच ऑनलाईन ओमटॅक्स क्रिकेट स्पर्धेत भाग घेऊन त्यांना ऑस्ट्रेलिया येथील पर्थ येथून ऑनलाईन गोलंदाज आणि फलंदाजीचे प्रशिक्षण घेण्याचचा सन्मान मिळाला आहे,तसेच एक कवी,गीते लिहून गीते स्वरबद्ध करून गाणारे गायक, कोविड या विषयावर वकृत्व स्पर्धेमध्ये भाग घेऊन त्यांना विशेष सन्मान प्राप्त झालेला आहे.






