जळगाव (प्रतिनिधी शेख रजत) : अल्पवयीन मुलीस फुस लावुन पळवुन नेल्यावर अत्याचार करुन तिला गर्भवती करणारा व त्याला गुन्हात मदत करणारा त्याच्या साथीदार अशा दोघांना एमआईडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. अटकेतील दोघांनी गुन्हा कबुल केला आहे.
तुषार पुरुषोत्तम पवार (वय- १९ कस्बे वाणी ता. दिंडोरी जि. नाशिक) व सचिन संजय मराठे (वय- २३ खंबाळे ता. त्रंबकेश्वर जि. नाशिक ) अशी या आरोपींची नावे आहे. १९ जुलै रोजी दुपारीच्या वेळी शहरातील एका अल्पवयीन मुलीस तुषार पवार याने पळवुन नेले होते. त्यानंतर त्याने तिच्यावर अत्याचार केल्याने ती गर्भवती झाली. या कामी तुषार यास त्याचा मित्र सचिन मराठे याने मदत करुन गुन्हास प्रोत्साहन दिले.
सुरवातीला एमआईडीसी पोलिस स्टेशनला पिडितेला फुस लावुन पळवुन नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासाअंती पीडितेवर अत्याचार व त्यातुन ती गर्भवती झाल्याचे निष्पन्न झाले. गुन्हात बलात्कारासह बालाकांचे लैंगिक अपराधापासुन संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम(४), (५),(एल),(६),१७ आदी कलम वाढवण्यात आले.
पो.नि. प्रताप शिकारे यांच्या पथकातील पो.उ.नि. रविंद्र गिरासे, सहायक फौजदार अतुल वंजारी, सचीन मुंढे, रमेश चौधरी, मिलींद सोनवणे, मुकेश पाटिल, तुषार गिरासे, आदिंनी तपासात परिश्रम घेतले. अटकेतील आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.






