सक्तीची वसुली थांबून कृषी पंपाचा विज पुरवठा सुरु करा – श्रीकांत ठाकरे यांची मागणी

कारंजा (प्रतिनिधी हाफीज खान) : अतिदृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं पूर्ण खरीप हंगाम शेतकऱ्याच्या हातून गेला शेतकरी आज मरणाच्या दारात उभा आहे आत्ता फक्त रब्बी हंगाम शेतकऱयांच्या हातात राहिला आहे पण महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापण्यात आले आहे.

कुठलीही सूचना न देता गावात कुठल्या प्रकारची दवंडी न देता रातोरात वीज कनेक्शन कापण्यात आले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार शेतकरी २५० दिवस कृषी पंपाची वीज वापर करतात. म्हणजेच शेतकरी जवळपास २००० तास वीज कसा वापरतो याचे उत्तर आम्हाला कंपनीने द्यावं सरकारने दिलेल्या कोरोडो रुपयांच्या अनुदानापैकीं किती शेतकऱ्यांनी वीज वापरली त्याची आकडेवारी आम्हाला वीज वितरण कंपनीने द्यावी असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आहे.

महावितरणने शेतकऱ्याची अडवणूक न करता कृषीपंपाचा वीज पुरवठा ४८ तासांच्या आत त्वरित सुरू करावा अन्यथा आम्ही शेतकऱ्याच्यावतीनं तीव्र आंदोलन करू, असा इशाराही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे श्रीकांत ठाकरे यांनी यावेळी बोलतांना दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here