मुंबई (संपादक सुनिल पाटील) : रक्तदान सहाय्य केंद्र कांदिवली पूर्व या नोंदणीकृत संस्थेचा तिसाव्या वर्धापनदिनानिमित्त हिंदुहृदसम्राट शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या नवव्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून शिवसैनिकांनी शिवसैनिक स्वेच्छा रकतदाते मित्रांना मरणोत्तर सन्मान देऊन आदरांजली वाहिली
कांदिवली येथील रक्तदान सहाय्य केंद्र आणि अंधेरी पुर्व येथील नित्यानंद नगर मित्र परिवार यांनी शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या नवव्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून आपल्या शिवसैनिक रक्तदाते मित्रांना मरणोत्तर मित्र स्मृती सन्मान प्रदान करून रक्तदान सहाय्य केंद्राचा तिसावा वर्धापदिन साजरा केला. हा सोहळा श्री छत्रपती शिवाजी महाराज समिती येथील प्रबोधनकार ठाकरे संकुल पार्ले पूर्व येथे शिवसैनिक मित्र परिवाराच्या उपस्थितीत यशस्वी झाला.
या सोहळ्यास भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस आणि स्वर्गीय माजी आमदार श्रीमान रमेश मोरे यांच्या पत्नी श्रीमती रश्मी रमेश मोरे आणि शिवसेनेच्या पहिल्या महिला माजी आमदार सौ. नीलाताई देसाई यांची उपस्थिती लाभली होती. या मित्र स्मृती सन्मान सोहळ्याचे वैशिष्ठ असे होते की मित्रांना आदरांजली वाहताना मित्रांच्या कार्याचा आणि समाजसेवेचा आढावा काव्य स्वरूपात सादर करण्यात येत होता,आणि या काव्यास सर्वांनी दाद दिली परंतु सर्वजण जुन्या आठवणींनी भावूक झाले होते.
रक्तदानाचे प्रणेते आणि कवी श्रीधर बुधाजी देवलकर यांनी आपल्या स्वरचित काव्यानी आदरांजली वाहताना उपस्थित परिवाराचे डोळे पाणावले होते. फेडरेशन ऑफ मुंबई ब्लड बँक सरचिटणीस डॉ.निलम मिझारा यांनी फोनद्वारे कार्यक्रमास आणि रकतदाते यांना शुभेच्छा दिल्या व एका पत्राद्वारे अभिनंदन पत्र पाठविले व ते पत्र सौ निला ताई देसाई यांनी सभागृहात वाचून दाखविले. तसेच गेली तीस वर्षे आपल्या पतीच्या कार्यात मासिक वेतनातून आर्थिक सहकार्य करणाऱ्या श्री देवलकर यांच्या पत्नी कामगार राज्य विमा योजना रुग्णालय कांदिवली येथील सेवा निवृत्त परीसेविका सौ.स्वाती श्रीधर देवलकर यांचा श्रीमंती रश्मी रमेश मोरे यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.
हा सोहळा यशस्वी करण्याकरीता आप्पा खानविलकर, राजन गिरधर, सुरेश देवरुखकर, ललित सबनीस, लक्ष्मण शेडगे. सत्यवान राणे, सुनील जाधव, आणि श्रीधर बुधाजी देवलकर या शिवसैनिकानी विशेष परिश्रम घेतले.






