कारंजा (तालुका प्रतिनिधी हफीज खान) : विदर्भातील सर्व हौशी नाट्यसंस्थेचे पदाधिकारी तसेच नाट्यपरिषदेच्या शाखेचे पदाधिकाऱ्यांनी दि. १ डिसेंबर रोजी मुंबई येथे दुपारी ४ वाजता संचालक, सांस्कृतिक कार्य मुंबई यांचे दालनात होऊ घातलेल्या राज्य नाट्य स्पर्धेचे आयोजन, वृद्ध साहित्यिक व कलावंत यांचे मानधन आणि इतर विषय, तसेच बालनाट्य प्राथमिक फेरीविषयी चर्चा करण्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई शाखा कारंजा प्रमुख कार्यवाह श्रीकांत एस भाके यांनी केले आहे.






