श्रीगोंदा (प्रतिनिधी) : शहरातील बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला होता. त्या घटनेला २४ तास उलटलेले नसतानाच दुसर्या दिवशीच याच परिसरात असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र्चे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला. कटावणी व हातोडीच्या सहाय्याने हे एटीएम तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान, पोलिसांच्या एटीएम फोडणारा एकजण संशयित पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
श्रीगोंदा पोलिसांचे एक पथक शहरासह पोलीस स्टेशन हद्दीतील बँकांचे एटीएमची तपासणी करण्यासाठी (दि.२६) च्या मध्यरात्री गेले होते. यात पोलीस नाईक भारत खारतोडे, वैभव गांगर्डे हे शहरातील एटीएमची तपासणी करत असतांना बँक ऑफ महाराष्ट्र्समोर त्यांना एक व्यक्ती दुचाकीवर बसलेला दिसली. ते त्याच्याजवळ जात असतांना त्याने पोलिसांना पाहून पळ काढला.त्याचवेळी एकजण बँक ऑफ महाराष्ट्र्च्या जिन्यांच्या पायर्यांवरून उतरताना पोलिसांना दिसला.
पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी करत एटीएमची पाहणी केली असता, त्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याचे पोलीसांच्या लक्षात आले. त्यामुळे संबंधीताला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक अमित माळी, हवालदार राजीव भोर यांनी घटनास्थळी भेट दिली.






