चिखली (प्रतिनिधी) : सायकलवर खेळत असलेल्या दहा वर्षीय मुलीवर सिक्युरिटी गार्डने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संबंधित आरोपीला अटक करण्यात आली आहे. जाधववाडी, चिखली येथे गुरुवारी (दि.२५) ही घटना घडली.
याप्रकरणी पोलिसांनी विनायक शिवाजी देशमुख (रा. आदर्श नगर, आळंदी रोड, दिघी) याला अटक केली असून, याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने शुक्रवारी (दि.२६) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला यांची दहा वर्षीय अल्पवयीन मुलगी सायकलवर खेळत होती. त्यावेळी आरोपी विनायक याने अल्पवयीन मुलीशी असभ्य वर्तन करत अत्याचार केला असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक मुंडकर अधिक तपास करीत आहेत.






