नागपूर येथे गो फर्स्ट एअरवेजच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; सर्व प्रवासी सुरक्षित

go-first-airways
file photo

नागपूर (उपसंपादक उमेश अबनलकर) : बेंगलोरहून पाटणाला जाणाऱ्या गो फर्स्ट एअरवेजच्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड आल्यामुळे या विमानाचे नागपूर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. या विमानात पायलटसह १३५ प्रवासी प्रवास करत होते. विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. या विमानातील सर्वजण सुखरूप आहेत.

गो फर्स्ट एअरवेजचं प्रवासी विमान बेंगलोरहून पाटणाला जात होते. यावेळी विमानाच्या इंजिनमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विमान नागपूरच्या दिशेने वळवण्यात आले. ज्यानंतर नागपूर विमानतळावर सुरक्षेचा उपाय म्हणून विमानाचे आपात्कालीन लँडिग करण्यात आले.

विमानातील सर्व प्रवाशांना नागपूर विमानतळावर उतरवण्यात आल्यानंतर तिथेच त्यांना अल्पोपहार देण्यात आला आहे. तसेच त्यांना पाटणाला जाण्यासाठी सायंकाळी एक खास विमान सोडण्यात येणार आहे. लँड केलेल्या विमानाची सध्या अभियांत्रिकी टीमकडून तपासणी करण्यात येत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here