नागपूरमध्ये निवृत्त महिला डॉक्टरची निर्घृणपणे हत्या

नागपूर (उपसंपादक उमेश अबनलकर) : येथील नंदनवन परिसरात एका निवृत्त महिला डॉक्टरची काही अज्ञात लोकांनी निर्घृणपणे हत्या केली आहे. या आरोपींनी मृत महिलेला खुर्चीला बांधून तिच्या तोंडावर चिकटपट्टी लावून तिचा गळा कापून तिची हत्या केली आहे. ही घटना नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

या प्रकरणी नंदनवन पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्यांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात असून पुढील तपास सुरु केला आहे. देवकीबाई जीवनदास बोबडे असं हत्या झालेल्या ७८ वर्षीय निवृत्त डॉक्टर महिलेचे नाव आहे. त्या नागपुरातील नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत आपली मुलगी आणि जावयासोबत राहत होत्या.शनिवारी रात्री सातच्या सुमारास अज्ञात लोकांनी त्यांची निर्घृणपणे हत्या केली. लुटमारीच्या उद्देशातून अज्ञात आरोपीनं ही हत्या केली असावी. असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मृत महिलेची मुलगी आणि जावई देखील पेशाने डॉक्टर आहेत. त्यामुळे दोघंही शनिवारी सकाळी आपल्या कामावर गेले होते. यावेळी मृत देवकीबाई घरी एकट्याच होत्या. याचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश करत देवकीबाई यांची निर्घृण हत्या केली आहे. शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here