जळगाव (संपादक सुनिल पाटील) – जय कालिका माता एज्युकेशन संस्था संचलित गुरुकुल व गोशाळा येथे दक्ष पोलिस टाइम्स चे संस्थापक विजय टाटीया व कार्यकारी संपादक राकेश पाटील यांनी भेट दिली.
त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष लालचंद पिपाडा यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचा सत्कार केला. संस्थेचे अध्यक्ष यांनी संस्थेचे मुलांना ५ कि.मी. यावे जावे लागते ही व्यथा मांडली त्यावेळी विजय टाटीया यांनी लगेच त्यांना चार चाकी गाडी देण्याचे कबूल केले. त्या वेळी संस्थेचे अध्यक्ष यांनी आभार मानले.








