अल्पवयीन प्रेयसीचा गर्भपात करणाऱ्या प्रियकरासह दोघांना बेड्या

पुणे (उपसंपादक वासंती देवळे) : अल्पवयीन प्रेयसीसोबत शरीर संबंध ठेवून ती गर्भवती राहिल्यानंतर तिला अवैधरित्या गर्भपात करण्यास भाग पाडल्या प्रकरणी प्रियकरासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.या दोघांसह गर्भपात करणार्‍या डॉक्टरला येरवडा पोलिसांनी अटक केली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अमित अबदेश यादव (वय १८ रा. निरामय हॉस्पिटल जवळ, वडगावशेरी) व त्याचा साथीदार धनंजय नामदेव रोकडे (वय ३८ ,रा. वडगावशेरी गावठाण) यांच्यासह गर्भपात करणारा डॉक्टर अनिल बाळकृष्ण वरपे (वय ५९, रा. वडगाव शेरी) यांना अटक करण्यात आली. या सर्वांवर बलात्कार व पोस्को कायद्यासह माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००८ चे कलम ६७ (बी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत घडला.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, अमित यादव याचे एका अल्पवयीन तरूणीसोबत प्रेम संबंध होते. त्या संबंधातूनच त्याने तिच्या सोबत शरीरसंबंध ठेवले. यातून अल्पवयीन तरुणी गर्भवती राहिली होती. त्यानंतर आरोपीच्या मित्राने देखील तिच्या सोबत जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले होते. त्यानंतर तिचा अश्लील व्हिडीओ तयार करत समाज माध्यमावर देखील आरोपीने पाठवला होता. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here