ठाणे (सहसंपादक सतीश बनसोडे) : जिल्ह्यातील उल्हासनगर येथे जावयाने आपल्याच सासूवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. हा जावई २७ वर्षांचा असून त्याची सासू ४५ वर्षांची आहे.
उल्हासनगरच्या हिललाईन परिसरात पीडितेचं घर असून आरोपी देखील उल्हासनगरलाच राहतो. आरोपी जावयाचं लग्नापूर्वीपासूनच पीडितेवर एकतर्फी प्रेम होतं.
पण, एका विवाहित महिलेशी लग्न करू शकत नसल्याने त्याने तिच्या मुलीला लग्नाची मागणी घातली. २०१८ मध्ये आरोपीचं लग्न पीडितेच्या मुलीशी झालं होतं. पण, आरोपीची वर्तणूक बदलली नाही. अखेरीस पिडीतेने बलात्कार झाल्याची तक्रार नोंदवली. या तक्रारीनंतर आरोपी जावई फरार असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.






