पुणे (जिल्हा संपादक सुरज घम) : येथील कोंढवा उंड्री परिसरातील एका घरात ऑनलाईन ऑर्डरची रात्री उशिरा डिलिव्हरी देण्यासाठी डिलिव्हरी बॉय आला. पार्सल ताब्यात घेणाऱ्या २३ वर्षीय तरुणीला पाहून त्याने आपल्या पॅटची चैन उघडून तरुणीसमोर लज्जास्पद कृत्य केले.
याप्रकरणी या तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून पोलिसांनी रोमान्ना फॅशन्स इंडिया कंपनीच्या डिलिव्हरी बॉय सतिश केंधले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबतची माहिती अशी, फिर्यादी तरुणीने एक्से पॅरिस ब्रॅड व्हाया रोमान्ना फॅशन्स इंडिया या कंपनीची लॅपटॉप बॅग ऑर्डर केली होती. या लॅपटॉप बॅगची डिलिव्हरी करण्यासाठी १ डिसेबर रोजी रात्री पावणेदहा वाजता कंपनीचा डिलिव्हरी बॉय सतीश केंधले आला होता. त्याने आपल्या पँटची चैन उघडून लज्जास्पद कृत्य केले. या प्रकाराची माहिती कळल्यावर तरुणीच्या आईने त्याला फोन करुन जाब विचारला असता त्याने “मी कोणालाही घाबरत नाही, काय करायचे ते करा,” असे बोलून त्यांना धमकीही दिली. तरुणीनी त्याची कंपनीकडे तक्रार केली होती. त्यानंतर आता पोलिसांकडे तक्रार केल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, सहायक पोलीस निरीक्षक दगडे तपास करीत आहेत.
Home पश्चिम महाराष्ट्र पुणे डिलीव्हरी बॉयनं पार्सल घेणार्या तरूणीला पाहून हस्तमैथुन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल






