माजी सैनिक दिपक चौधरी व इनायत अली यांच्या सेवापूर्ती वाढदिवसानिमित्त गहिवरून आले सभागृह

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी.पाटील) : जिल्ह्यातील धरणगाव येथे नगरपालिकेतील सर्वांच्या सुपरिचित असलेले कर्मचारी तसेच अभ्यासू व्यक्तिमत्व मनमिळावू स्वभाव असणारे आणि नगर परिषदेमध्ये विविध शाखांमध्ये ज्यांच्या बुद्धी चातुर्याच्या सर्वांना अनुभव आहे असे मा श्री दिपक सखाराम चौधरी व मा श्री इनायत अली सय्यद अली यांचा आज सेवापूर्ती चा कार्यक्रम नगरपरिषदेतील कर्मचाऱ्यांनी सभागृहात आयोजित केलेला होता.

दीपक चौधरी भाऊसाहेब यांनी आज पर्यंत नगर परिषदेमध्ये विविध शाखांमध्ये जसे लेखापरीक्षण,आस्थापना विभाग, पाणीपुरवठा विभाग, वसुली विभाग ..इत्यादीं मध्ये काम करून आपली चुणूक दाखवून सर्व कर्मचाऱ्यांमध्ये हवेहवेसे व्यक्तिमत्व निर्माण करून त्यांनी आज सेवापूर्ती स्वीकारली. तसेच श्री. इनायत अली सय्यद अली हे देखील कर्मचाऱ्यांमध्ये तितकेच लोकप्रिय होते २६ जानेवारी असो किंवा १५ आगस्ट असो आपल्या राष्ट्रध्वजाला कसे सजवावे यापासून तर राष्ट्रध्वजाचे नियम या पर्यंत यात ते अत्यंत निष्णात मानले जायचे त्यामुळे आज दोन्ही कर्मचाऱ्यांना निरोप देतेवेळी अधिकारी वर्ग ते कर्मचारी वर्गापर्यंत सर्वांना गहिवरून आले होते. आणि सत्काराच्या प्रसंगी तर दोघा कर्मचाऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू तरळताना अनेकांनी पाहिले.

तसेच धरणगाव शहरातील ज्येष्ठ माजी सैनिक मा. श्री.नवनीत पुंडलिक पाटील यांच्या 71 व्या वाढदिवसानिमित्त त्यांना सुद्धा याप्रसंगी शुभेच्छा देण्यात आल्या. श्री.नवनीत पाटील हे 1971 भारत-पाक युद्धात प्रत्यक्ष सहभागी होते. तसेच भारत-बांगलादेश मुक्ती सेना म्हणूनही त्यांनी सेवा बजावलेली आहे. त्याच प्रमाणे सुवर्ण मंदिरातील अतिरेक्यांच्या मुसक्या आवळण्यात मिशन रेड ब्लू स्टार मध्ये सुद्धा त्यांच्या सहभाग होता. अश्या ज्येष्ठ माजी सैनिकाचा आज या प्रसंगी यथोचित वाढदिवसानिमित्त सत्कार करून त्यांचा योग्य मान सन्मान करण्यात आला. याप्रसंगी शिवसेनेचे लोकसभा सहसंपर्कप्रमुख श्री गुलाबराव जी वाघ नगरपरिषदेचे कर्मचारी व ज्येष्ठ माजी सैनिक यांच्या विषयी माहिती देत असताना सर्वांना गहिवरून आले अण अश्रूंनी वाट मोकळी केली…!

प्रसंगी धरणगाव नगरीचे प्रथम नागरिक लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री निलेश भाऊ चौधरी शिवसेना तालुका उपप्रमुख राजेंद्र ठाकरे शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन संघटक संजय चौधरी गटनेते पप्पू भावे भानुदास विसावे विलास महाजन विजय महाजन भागवत आप्पा चौधरी वासुदेव चौधरी जितेंद्र धनगर सुरेश महाजन अहमद पठाण कमलेश बोरसे,विनोद रोकडे,अरविंद चौधरी, सागर ठाकरे, प्रितेश ठाकरे,योगेश पाटील त्याच प्रमाणे भाजपा गट नेते मा.श्री.कैलास माळी सर ललित येवले तसेच सर्व नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते त्याच प्रमाणे मोठ्या संख्येने नगरपरिषदेतील सर्व अधिकारी-कर्मचारी या दुग्धशर्करा योग दिनी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here