जळगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी.पाटील) : जिल्ह्यातील धरणगाव येथील बसस्थानका समोरील काम तात्काळ होण्या संदर्भात धरणगाव येथील पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते आबा महाजन (वाघ) यांना आपण उपोषण सोडा आपली मागणी ही तात्काळ पूर्ण केली जाईल असे आश्वासन शिवसेना उपजिल्हाप्रमुख पी एम पाटील, गटनेते पप्पू भावे यांनी दिले.
बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांना सांगितले बसस्थानकासमोरील बांधकाम तात्काळ सुरू करा १५ दिवसाच्या आत काम पूर्ण केले जाईल व लागलीच समोरील रस्त्याच्या कामाला सुद्धा सुरुवात केली जाईल असे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्याने आबा (वाघ) यांनी उपोषण सोडले.
याप्रसंगी पी एम पाटील, गटनेते पप्पू भावे, अॅड.वसंतराव भोलाने, बांधकाम विभागाचे सपकाळे, लोटन महाजन, वाल्मीक पाटील, राजू महाजन, संजू चौधरी,राहुल रोकडे उपस्थित होते.






