शासनातर्फे शेतक-यांनी नोंदणी केलेल्या मका खरेदी शासनाने खरेदी बंद केल्यानंतर राहीलेल्या शेतक-यांना मार्केट विक्री भाव फरक अनुदान मिळणे बाबत..

चोपडा (ता.ग्रामीण प्रतिनिधी संदिप पाटील) – शासनाने मका खरेदीसाठी शेतक-यांची मोठ्या प्रमाणात नोंदणी झाली व शासनाकडून दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली .शासनाने 30 जुलै 2020 पर्यंत जळगाव जिल्ह्यात 25 हजार मेट्रीक टन मका खरेदीचे उद्दिष्ट दिले होते. मात्र 30 जुलैला दुपारून शासनाकडून मका खरेदी बंद करण्यात आली.त्यात अनेक माल घेवून आलेले शेतकरी त्यांच्या रोषास शेतकी संघास समारे जावे लागले. निदान त्या दिवसापुरते आलेले शेतक-यांचे वाहन आजही मोजणे होणे आवश्यक आहे. ज्या शेतक-यांनी मका नोंदणी केलेली आहे ,खरेदी विना शेतक-यांकडे पडून आहे.अशा शेतक-यांना आजही आशा आहे की आपला काम माल मोजला जाईल मात्र शासन तसा आदेश न काढता ठरावीक मेट्रीक टन व ठराविक कालावधी मोजणी तारीख देते यामुळे शेतकी संघास शेतक-यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.1061 शेतक-यांची नोंदणी झाली असून त्यापैकी 260 च्या जवळपास मका मोजनी झाली आहे. तरीही 800 शेतकरी मजा विक्री साठी शासनाच्या आदेशाची वाट पाहत आहेत. खरीप हंगामातील मका यायला काही काळ शिल्लक असून ज्या शेतक-यांचा माल विक्री झालेला नाही अशा शेतक-यांना माल मार्केटमध्ये विक्रीस परवानगी द्यावी .व त्यांच्याकडून माल विक्री केलेली सातवीची सत्यता पडताळून क्विंटल मागे 300 ते 350/- शासनाने मका अनुदान सरळ शेतक-यांच्या खात्यात जमा करावे.असे निवेदन मका विक्री नोंदणी धारक शेतक-यांच्या वतीने श्री हीम्मतराव पुंडलिक पाटील रा.गरताड, भाजपा जेष्ठ कार्यकर्ता, तथा संचालक चोपडा शेतकी संघ यांनी चोपडा येथली तहसीलदार श्री अनिल गावीत यांच्याकडे निवेदन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here