नाशिक (विशेष प्रतिनिधी) – जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्वगृही तसेच शाळेत एक दिवसाचे अन्नत्याग आंदोलन केले यामध्ये शासनाने 10 जुलै 2020 ला प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेद्वारे 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत रुजू झालेल्या शिक्षक कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना नाकारून त्या आधिसूचनेवर हरकती आक्षेप मागितल्या होत्या त्यानुसार महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने कायदा आणि सेवाशर्तीतील तरतुदीनुसार 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत रुजू झालेले शिक्षक आणि कर्मचारी हे जुन्या पेन्शन योजना नुसार पेन्शन मिळण्यासाठी हक्कदार आहेत म्हणून ही अधिसूचना रद्द करण्याचे सुचविले होते परंतु अजूनही ही अधिसूचना रद्द करण्यात आलेले नाही म्हणून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेतर्फे राज्यभर सोमवारी (तारीख 10 )संपूर्ण दिवसभर अन्नत्याग आंदोलन करण्यात आले
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकत्रित आंदोलन करता येत नसल्याने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी घरातच हे आंदोलन केले यामध्ये नाशिक विभागातील मुख्याध्यापक ,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. ही अधिसूचना लवकरात लवकर रद्द करावी अन्यथा यापुढील काळात शिक्षक, आणि शिक्षकेतर बांधव रस्त्यावर उतरतील असा इशारा गुलाबराव भामरे, डी यु अहिरे, दत्ता वाघे पाटील , नरेंद्र ठाकरे, विनोद हिरे, शंकर सांगळे, शरद निकम ,संजय पवार, संजय (मुन्ना )सावंत, बी के जाधव, उमेश मोरे, अनिल परदेशी, संजय पाटील, ग्रंथपाल विभाग प्रमुख विलास सोनार, गोकुळ चव्हाण,सुभाष पाटील, अर्जुन सावंत, हिम्मतराव भामरे, सचिन मेधने, योगेश पवार, तुकाराम मांडवडे ,विनीत पवार, टी पी पवार, किरण पाटील ,समाधान ढोकरे,भारत खैरनार ,नीलिमा पाटील , शुभांगी टकले , मोहिनी भगरे, शुभदा कुलकर्णी , आपटे मॅडम, मनीषा भोले, मनीषा कापुरे व तमाम जिल्ह्यातील शिक्षक परिषदेचे पदाधिकारी व सदस्य महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या पदाधिकारी यांनी दिला आहे.








