मुंबई (हितेश मिस्त्री) – कोविड – १९ च्या आजाराच्या प्रादुर्भावाच्या काळयामध्ये नवी मुंबई आयुक्तालयामधुन मोटार वाहन चोरीच्या
तक्रारी पोलीस ठाण्यांमध्ये प्राप्त झाल्या होत्या. सदर तक्रारीच्या अनुषंगाने मा. पोलीस उप आयुक्त, परि ०१, नवी मुंबई, पंकज डहाणे. सहा. पोलीस आयुक्त, वाशी विभाग विनायक वस्त यांनी मोटार वाहन चोरीच्या गुन्हयावर लक्ष केंदीत करून त्यांचेविरूध्द कडक कारवाई करण्याकामी विशेष पथके नेमली.
त्या अनुषंगाने रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. योगेश गावडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. गिरीधर गोरे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे पथक तयार केले. सदर पथकाने रबाळे पोलीस ठाणे हददीतील तसेच नवी मुंबई आयुक्तलयातील वाहन चोरीचा तपशिल संकलीत केला. त्यानुसार चोरी झालेल्या वाहनांचे प्रकार, चोरीचे ठिकाण, चोरीची वेळ व वार यांचे वर्गीकरण करून अभ्यासपूर्ण रित्या तपास सुरू केला. वाहन चोरीच्या गुन्हयातील घटनस्थळ, चोरी केलेली वाहने लपवून ठेवण्याची ठिकाणे याचा तांत्रिक तपास कौशल्यपूर्ण करून वाहन चोरी करणाऱ्या गुन्हेगारांचा आभ्यास करून खालील नमुद दोन आरोपीतांना रबाळे पोलीस ठाणे गुन्हा र.क्र २१३/२० कलम ३७९,३४ भादवि या गुन्हयामध्ये अटक केली. नमूद आरोपीतांकडे तपास करता सदरचे आरोपीत हे खालील नमुद गुन्हयात निष्पन्न झालेले आहेत. त्यांच्याकडुन सदरचे गुन्हे उघडकीस आणण्यात आलेले आहेत.
राकेश शिवाजी पवार, वय २५ वर्षे, राठी-बालेगाव, उग्ररोली, ता – मुरबाड, जिल्हा – ठाणे, चंद्रा पुतय्या पुजारी, वय ४२ वर्षे, राठी – रूम नं १०१, श्रीयोग बिल्डींग, नांदीवली तलाव जवळ, हाजी मलंगरोड, कल्याण पुर्व, जिल्हा – ठाणे यांना अटक करण्यात आली असून, त्यांनी गु.र.क्र बाळे पोलीस ठाणे २१३/२० कलल ३७९,३४ भादवि. रबाळे एमआयडीसी पोलीस ठाणे १४६/२० कलल ३७९ भादवि. कोपरखैरणे पोलीस ठाणे, १५८/२० कलल ३७९ भादवि. तळोजा पोलीस ठाणे, १५३/२० कलल ३७९ भादवि.,हस्तगत केलेली मालमत्ता ०४ चारचाकी वाहने मुबई, नवी मुंबई वर्णन किंमत रूपये ३,००,०००/ एक Ashok Leyland कंपनीचा Dost LXया मॉडेलचा फिक्कट पिवळया रंगाचा लहान टेम्पो. किंमत रूपये २,३०,०००/ एक महिंद्रा कंपनीचा पांढऱ्या रंगाचा बोलेरो पिकअप. किंमत रूपये. ३,५०,०००/ एक महिंद्रा कंपनीचा पांढऱ्या रंगाचा बोलेरो पिकअप. किंमत रूपये. ३,००,०००/ एक महिंद्रा कंपनीचा पांढऱ्या रंगाचा बोलेरो पिकअप. एकुण किंमत ११,७०,०००/- रूपये या चोरींची कबूली दिली आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संजय कुमार, सह पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर,. पोलीस उप आयुक्त, परि०१, नवी मुंबई, पंकज डहाणे, सहा. पोलीस आयुक्त, वाशी विभाग विनायक वस्त सो यांच्या मार्गदशनाखाली रबाळे पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश गावडे, पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) गिरीधर गोरे, पोलीस निरीक्षक उमेश गवळी, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सपोनि प्रविण फडतरे, पोउनि अमित शेलार, पो. ना.क्र. २१०/ राउत, पो.ना.क्र. २३८१/माळी, पो.ना.क्र. २६६०/तडवी, पो.ना.क्र १७६१/कटके, पो.शि.क्र.२३८१/विर व पो.शि.क्र. १२००७/शेळके, पो.शि.क्र ३४५३/कारंजकर, पो.शि.क्र ३२०५/ठाकुर, पो.शि.क्र १२०८४/गिते, पो.शि.क्र ३२०१/सुर्यवंशी, यांनी केलेली आहे. नमूद अटक आरोपीतांकडून नवी मुंबई परीसरातील आणखी काही उघड होण्याची शक्यता आहे.







