मुंबई (अनिल साळवी) – नालासोपारा पुर्व परिसरात तुलिंज पोलीस ठाण्याचे हद्दीत घरफोडी चोरीचे घटनांना आळा घालण्याकरिता दत्तात्रय शिंदे, पोलीस अधीक्षक, पालघर, यांचे सुचनेप्रमाणे विजयकांत सागर, अप्पर पोलीस अधीक्षक, वसई विभाग व अमोल मांडवे, उपविभागिय पोलीस अधिकारी, नालासोपारा यांनी सदर घरफोडी चोरींचा आढावा घेवून अशा प्रकारचे गुन्हे करणा-या गुन्हेगारांचा शोध घेवून त्यांना अटक करणेबाबत सुचना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे डी.एस.पाटिल, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, तुळींज पोलीस ठाणे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक संदीप व्हसकोटी यांना सदरच्या चोरीच्या घटनांना पायबंद बसविण्याकरीता त्यांची सत्वर उकल करण्याबाबत आदेश दिलेले होते. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक संदीप व्हसकोटी यांनी व त्यांचे पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी कोणताही तांत्रिक पुरावा नसतांना कौशल्यपुर्ण तपास करून गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळवुन आरोपीत सुजॉय उर्फ बंगाल गोकुल बाग,वय-२३ वर्षे, रा. रा.रुम नं ०७ भरत कॉलनी चाळ डॉन लाईन आचोळे रोड जवळ लिटील फ्लाओर स्कुल नालासोपारा पुर्व ता वसई जि पालघर, यास ताब्यात घेवुन त्यास विश्वासात घेवुन विचारपुस केली असता. तुळींज पोलीस ठाणे गु.र.नं. । ६८६/२०२० भा.दं.वि.सं.कलम ४५७, ३८० प्रमाणे, दाखल गुन्हयातील गेला माल १,५७,६०० (३५ मोबाईल) पैकी ९७,१००/- रुपये किंमतीचे एकुण २९ मोबाईल त्याचे अंगझडतीत मिळुन आल्याने नमुद गुन्हयात दि.०९/०८/२०२० रोजी अटक करुन त्यास मा. न्यायालयासमोर हजर केले असता आरोपीत यास दिनांक १३/०८/२०२० रोजी पावेतो पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस.पाटील, प्रभारी अधिकारी, तुळींज पोलीस ठाणे यांचे मागदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप व्हसकोटी, सफौ/शिवानंद सुतनासे, पो.हवा/युवराज जावळे पोना/आनंद मोरे, पोना/शेखर पवार, पोना/प्रशांत सावदेकर, पोना/संदीप शेरमाळे, पोकॉ/सुखराम गडाख, पोकॉ/योगेश नागरे यांनी केली आहे.







