
चोपडा (संदिप ओली) – शेतकरी व आदिवासी यांचे विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत यासाठी दि.१० रोजी चोपडा तहसीलदार यांच्या द्वारा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकसंघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय नेत्या प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.यात शासनाने मका खरेदी केंद्र तात्काळ सुरू करावे.खतांचा काळा बाजार बंद करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा.आदिवासी वन जमीनधारक शेतकऱ्यांना वि. का.सोसायटीत सभासद करून त्यांच्यासाठी स्वतंत्र वि. का.सोसायटी स्थापन कराव्यात.अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी.दुधाला ३० रु.शासकीय भाव मिळावा व दुध भुकटीसाठी ५ रु.अनुदान वाढवून द्यावे.सामुदायिक वनपट्टे तात्काळ द्यावे.जळगाव व नंदुरबार जिल्ह्यातील असंख्य दाव्यांची सूनवाईसाठी जिल्हा प्रशासनाला त्वरीत आदेश द्यावेत.वनजमीन धारकांना तात्काळ ७/१२ देण्यात यावा.तेंदू व इतर गौण उपज संकलनात बेकायदेशीर हस्तक्षेप थांबवावा.शारीरिक अंतर पाळत ग्रामसभा घेण्यास परवानगी देण्यात यावी.जळगाव व नंदुरबार जिल्ह्यातील वनपाडे व वनगाव तात्काळ महसूल करण्यात यावीत. आदिवासी लोकांना तात्काळ खावटी अनुदान वाटप करण्यात यावे.आदी प्रलंबित मागण्यांचा समावेश आहे.
लोकसंघर्ष मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस संजीव शिरसाठ, जिल्हा अध्यक्ष प्रकाश बारेला,धर्मा बारेला,यासु बारेला,गेमा बारेला, गोपाल महाराज यांच्याहस्ते नायब तहसिलदार राजेश पऊळ यांनी निवेदन स्वीकारले असून यावेळी खेलसिंग बारेला,प्रताप बारेला,बुधा बारेला,गेमा बारेला, रमेश बारेला, रुपसिंग पावरा, मुरलिधर सोनवणे, रुपसिंग बारेला,गोपाल चव्हाण,शरद कोळी, जयराम पावरा, रमेश पावरा, मुकेश पावरा, सुभाष बारेला, बबलु बारेला आदी उपस्थित होते.






