मीरारोड येथे जुगार खेळणाऱ्या महिलांसह ८ जणांना पकडले

ठाणे (सहसंपादक सतीश बनसोडे) : मीरारोडच्या नया नगर पोलिसांनी एका इमारतीतील सदनिकेत छापा मारून जुगार खेळणाऱ्या ८ जणांना पकडले व रोख व जुगाराचे साहित्य मिळून ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.



नया नगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सुरेंद्र शिंदे व धनंजय गर्जे सह पाटील , थोरात , तारडे , गुरव यांच्या पथकाने रात्री कानूंगो इस्टेट मधील साई पुष्पक इमारतीतल्या एका सदनिकेत मिळालेल्या माहितीच्या आधारे धाड टाकली . त्यावेळी संदेश येलप्पा विरकर (वय ४०) व सोनल रावजी चव्हाण (वय ३७) दोघेही रा . मोगरापाडा,अंधेरी ; मंगल प्रसाद शोभनाथ (वय ६२) व किशोर अमृतलाल गडा (वय ५५) दोघेही रा . शांतीनगर सेक्टर ३, मीरारोड ; विजय आनंदभाई मांडलिया (वय ४६) रा . एक्सर तलावाजवळ, बोरीवली ; मीना शांतीभाई परमार (वय ५२) रा . बेव्हर्ली पार्क, मीरारोड; गिता नितीन रुगानी (वय ५०) रा . मिलाप पीव्हीआरच्या मागे, कांदीवली ; शोभा अशोक हरसोरा (५१) रा . कानुंगो इस्टेट, मीरारोड अशी पत्त्यांचा जुगार खेळताना पकडलेल्यांची नावे आहेत.



पोलिसांनी मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे. जुगार खेळणाऱ्यात महिलांचा पण समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here