तलवारबाजी स्पर्धेतील यशाबाबत लतिका म्हात्रेंचा मैत्री फांऊडेशनकडून सत्कार

नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) : वेस्टर्न कॉलेज ऑफ कॉमर्स अँड बिसनेस मॅनेजमेंटच्या लतिका म्हात्रे हिने तलवारबाजीमध्ये मुंबई विद्यापीठ इंटर कॉलेजिएट तलवारबाजी स्पर्धेत कांस्य पदक पटकावले. तसेच तिचे ऑल इंडिया अखिल भारतीय आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धा २०२१-२२ साठी निवड झाली आहे.

लतिका म्हात्रे हिने कांस्य पदक जिंकून नेरुळ नवी मुंबईचे नाव उज्वल केले आहे. त्याबद्दल लतिका व प्रशिक्षक मिलिंद ठाकुर, विश्वजीत जाधव, वैभव पेटकर, सिद्धांत मस्कर यांना प्रोत्साहन देण्यासाठी मैत्री फाऊंडेशन नवी मुंबई ( रजि.) माध्यमातून सत्कार करण्यात आला.

यावेळी मैत्री फाउंडेशन नवी मुंबई संस्थापक अक्षय काळे, नवी मुंबई महानगरपालिका माजी उपमहापौर शशिकांत बिराजदार, समाजसेवक देवनाथ म्हात्रे, समाजसेवक सतिश शिंदे, व इतर सभासद उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here