माहिती अधिकार कायद्याचे हत्यार उपसले..७ अपीलार्थीच्या अर्जावर एकाचदिवशी सुनावणी १० दिवसात माहिती देण्याचे आदेश
चोपडा (प्रतिनिधी) : तालुक्यातील वडती गावातील ग्रामस्थांनी एकाच वेळी अनेकांनी ग्रामपंचायत कारभाराविषयी साशंकता निर्माण झाल्याने माहिती अधिकार कायद्याचे हत्यार उपसत माहिती मागितल्याने पंचायत समिती कार्यालयात आज दि.१३ रोजी ७ अपीलार्थीच्या अर्जावर सुनावणी होऊन ग्रामसेवकांस १० दिवसांचे आत आवश्यक ती माहिती अवलोकनार्थ उपलब्ध करून देण्याचे आदेश एबीडीओ निशा जाधव यांनी दिले.यावेळी ग्रामसेवक,अपिलार्थी,व एबीडीओ हे उपस्थित होते.
दरम्यान एकाच गावातील एवढ्या मोठ्या प्रमाणावर अर्ज पडल्याने गावात खळबळ उडाली आहे.याप्रसंगाला ग्रामसेवक जबाबदार असल्याचे मत गावकऱ्यांनी व्यक्त केले आहे.ग्रामसेवक मनमानी कारभार करून गावकऱ्यांना हिडीस व उर्मटपणाची वागणूक देत असल्याने प्रचंड रोषाचे रुपांतर माहिती अधिकार कायद्याचा बडगा उगारण्यात झाले आहे. ग्रामपंचायत विभागातील वेगवेगळ्या विषयांची माहितीत १४व्या वित्त आयोगाचा निधी, घरकुल, मासिक सभा,जमा-खर्च, अशी अनेक प्रकारची माहिती अनेक जणांनी मागितली आहे.त्यातील ७अर्जावर आज अपील झाले . उर्वरित १५ अर्जाच्या आसपास अर्जावर सुनावणी बाकी असल्याची माहिती गावकऱ्यांचे तोंडून ऐकावयास मिळाली ग्रामसेवकाची मुजोरी गगनाला भिडली असून “हम करे सो कायदा”गावकऱ्यांचे नाके नऊ आला आहे.याप्रकाराने अशांतता निर्माण झाली असल्याचे चित्र आज आहे.
वडती ग्रामपंचायतीत माहीती अधिकारांचा पडला पाऊस चोपडा तालुक्यातील वडती गृप ग्राम पंचायतमधे कदाचित आतापर्यंत जिल्ह्यात कोणत्याही ग्रामपंचायतीत येवढे माहीत अधिकार पडले नसावेत. वडती ग्रामपंचायतीत आतापर्यंत 22+ च्या वर माहीत अधिकार अर्ज दाखल करण्यात आले आहे. त्या पैकी आज रोजी 7 अर्जची प्रथम अपील व सूनवाही झाली परंतु त्यात कुठलीच माहिती मिळाली नाही. फक्त सुचना देऊन 10 दिवसात माहीती देण्यात यावी अशी सुचना दिली. त्यामुळे प्रशासकीय अधिकारी संबधीत ग्रामसेवकाची पाठराखण करत आहे अशी शंका अर्ज धारकांमध्ये होत आहे.
ग्रामपंचायत वडती ग्रामसेवक नरेंद्र गोरख शिरसाठ यांचा चुकीचा गैर कारभारा मुळे ग्रामस्थांना तोडी स्वरुपात अनेक वेळा कार्यालय फेऱ्या मारल्या परंतु माहीत अधिकार न मिळाल्यामुळे नागरिक त्रस्त झाले त्यांनी माहिती अधिकार अधिनियम 2005 चा अवलंब केला परंतु महाशय ग्रामसेवक यांनी कुठलीही माहिती न देता लोकांची दिशाभूल व खोटे ठरवण्याचा प्रयत्न करू पाहताय. तालुक्यात आता पर्यंत कुठल्याही ग्रामपंचायतीत एवढे महिती अधिकार प्राप्त झाले नाहीत ग्रामसेवक यांच्या मनमानी व हुकूमशाही कारभारामुळे लोक त्रस्त होऊन माहिती अधिकाराचा अवलंब केला आहे. परंतु सदर अर्जाला कुठलीही किंमत दिली जात नाही व माहिती मिळत नाही त्यामुळे ग्रामपंचायत वडती येथे गैर कारभाराची चर्चा होत आहे. तरी ग्रामपंचायत वडती कारभाराची चौकशी होऊन हुकूमशाही मनमानी कारभाराच्या विरुद्ध ग्रामसेवकाची कसून चौकशी व्हावी संबंधितांच्या अशी गावातील सुज्ञ व सुशक्षित नागरिकांकडून चौकशीची मागणी होत आहे.






