पुणे (जिल्हा संपादक सुरज घम) : मैत्रिणीला गिफ्ट देण्यासाठी आणि व्यसन करण्यासाठी पुण्यातील नामांकित सराफा दुकानातून दागिन्यांची चोरी करणाऱ्या अनिकेत हनुमंत रोकडे (वय २३) आणि वैभव संजय जगताप (वय २२) या दोन चोरट्यांना हडपसर पोलिसांनी अटक केली.
दोघेही आरोपी पुण्यातील नामांकित महाविद्यालयात वैद्यकीय शाखेचे शिक्षण घेतात. त्यातील एक जण बी ए एम एस तर दुसरा बीएससी नर्सिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे. हडपसर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल आहे. या दोघांनी मैत्रिणीला हीच देण्यासाठी आणि व्यसन करण्यासाठी अशाप्रकारे चोऱ्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यात होता अडीच लाख रुपये किमतीचा सोन्याच्या चार अंगठ्या जप्त केल्या.
हडपसर येथील रांका ज्वेलर्समध्ये सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी आलेल्या दोघा तरुणांनी चोरी केल्याची तक्रार पोलिसात आली होती. 8 डिसेंबर रोजी हा प्रकार घडला होता. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली असता त्याच दिवशी कोथरूड परिसरातील एका ज्वेलर्स मधूनही दोन तरुणांनी अशा प्रकारे चोरी केल्याचे समोर आले होते. त्यानंतर हडपसर पोलिसांनी सीसीटीव्ही तपासून तांत्रिक विश्लेषण करत आरोपींना अटक करण्यात आली.






