कॅफेत जबरदस्ती घुसून तरुणाची दादागिरी; मद्यपान करताना केले फोटोशूट?

जळगाव (क्राइम रिपोर्टर शाहिद खान) : शहरात गुन्हेगारीचे प्रमाण खूप वाढत आहे. आता या गुन्हेगारीचे लोण अल्पवयीन तरुणांपर्यंत पोहचले असल्याचे मंगळवारी शहरातील मुळजी जेठा महाविद्यालयाजवळील एका कॅफेत दिसून आले.

याबाबत समजलेली माहिती अशी की, मंगळवारी दुपारच्या सुमारास मू.जे.महाविद्यालयाजवळ असलेल्या एका कॅफेत तीन तरुण जबरदस्ती शिरले. कॅफेच्या पहिल्या माळ्यावर असलेल्या फॅमिली कॅबिनला जाऊन त्याठिकाणी बसलेल्या सर्वांना त्यांनी जबरदस्ती हाकलले.

तसेच त्यांनी या फॅमिली कॅबिनमध्ये मद्यपानास सुरुवात केली. यावेळी वेगवेगळ्या पोज देत त्यांनी फोटो शूटही केले. यावेळी त्यांना आवरणाऱ्या कॅफे कर्मचाऱ्यांनाही त्यांनी धमकावले असल्याचे समजते आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here