शाळकरी मुलींशी गैरवर्तन; रिक्षा चालकास अटक

पुणे (जिल्हा संपादक सुरज घम) : शाळेत जाणा-या मुलींसोबत रिक्षा चालकाने गैरवर्तन करत त्यांचा विनयभंग केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करत पोलिसांनी रिक्षा चालकाला अटक केली आहे. हा प्रकार 4 ऑक्टोबर ते 15 डिसेंबर या कालावधीत मोशी चौक रिक्षा स्टॅन्ड, दोस्ती हॉटेल समोर, जुना आळंदी रोड मोशी येथे घडला.

 

संजय सोपानराव शिंदे (वय 45, रा. मोशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अल्पवयीन मुलगी आणि तिची मामे बहीण रिक्षातून शाळेत जात होत्या. त्यावेळी आरोपीने मुलींचा वारंवार पाठलाग केला. त्यांच्या इच्छेविरुद्ध फिर्यादी आणि त्यांच्या मामे बहिणीसोबत गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग केला. फिर्यादी यांनी याबाबत घरी सांगून पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here