औरंगाबाद रोडवर दोन धावत्या शिवशाही बसवर दगडफेक; गुन्हा दाखल

नाशिक (विशेष प्रतिनिधी) : महामार्ग आणि औरंगाबाद रोडवर दोन धावत्या शिवशाही बसवर दगडफेक करण्यात आल्याची घटना बुधवारी (दि.२२) घडली. या घटनेत बसच्या काचा फोडण्यात आल्याने नुकसान झाले असून,चालकांनी वेळीच प्रसंगावधान राखत बस बाजूला थांबविल्याने अनर्थ टळला.

याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. बसचालक कृष्णा कदम (रा.येसगाव ता.मालेगाव) यांनी तक्रार दाखल केली आहे. कदम बुधवारी (दि.२२) एमएच १८ बीजी ३९९८ या शिवशाही बसवर सेवा बजावत असतांना महामार्गावरील जत्रा हॉटेल भागात उड्डाणपुलावर डिव्हायडर उभ्या असलेल्या अज्ञात दोन समाजकंटकांनी धावत्या बसवर दगड फेक केली.

याचवेळी औरंगाबाद डेपोची एशियाड बस एमएच २० बीएल ३८८२ वर दुचाकीस्वारांनी दगडफेक केली. नाशिककडून औरंगाबादच्या दिशेने ही बस जात होती. शिलापूर येथील आर्मस्टॉंग कंपनीसमोर सायंकाळच्या सुमारास बस उड्डाणपुलावरून जात असतांना दुचाकीवरील दोघा अज्ञात समाजकंटकाने बसवर दगडफेक करीत पोबारा केला. या घटनेत चालकाच्या बाजूूची मुख्य आणि प्रवाशी खिडक्यांच्या काचा फुटल्या असून.दोन्ही गुह्यांप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार गांगुर्डे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here