खळबळजनक! डीजे नाही आणला म्हणून नवरदेवाने उचललं टोकाचं पाऊल, लग्नाआधी केली आत्महत्या

after-death-of-bride-marriage-with-sister-immediately

नवी दिल्ली (उपसंपादक जीवन षाकया) : घरात लग्नाची, नव्या नवरीच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू असताना एक भयंकर घटना घडली आणि क्षणात हसतं खेळतं घर उद्ध्वस्त झालं आहे.लग्नाआधीच नवरदेवाचा मृत्यू झाल्याची मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. सुखी संसार सुरू होण्याआधीच कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. लग्नाच्या दिवशी नवरदेवाने आत्महत्या केली आहे. वऱ्हाड निघण्यापूर्वी काही मिनिटं आधी नवरदेवाने टोकाचं पाऊल उचललं आहे. आपल्या लग्नात डीजे का आणला नाही, अशी विचारणा करत त्याने गळफास घेतल्याचं म्हटलं जात आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

तरुणाने लग्नापूर्वी काही क्षण आधी आत्महत्या केल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. नवरदेवाने हा निर्णय़ नेमका का घेतला असावा याची सध्या पोलीस चौकशी करत असून त्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील बांसवाडा परिसरात राहणाऱ्या लाल सिंह उर्फ विनोदच्या लग्नाचं वऱ्हाड निघण्याच्या तयारीत होतं. सगळे पाहुणे आणि मित्रमैत्रिणी जमले होते. कुटुंबात आनंदाचं वातावरण होतं. तेवढ्यात विनोद घरातून बाहेर गेला आणि परत आलाच नाही.

लग्नाआधी नवरदेवाची आत्महत्या; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा

विनोदने त्याच्या घराजवळ असलेल्या झाडावर गळफास घेऊन आत्महत्या केली. विनोदने ही आत्महत्या का केली, याचा पोलीस शोध घेत आहेत. लग्नात डीजे आला नसल्यामुळे तो नाराज असल्याची चर्चा वऱ्हाडी मंडळींमध्ये होत होती. त्यातूनच त्याने हे धक्कादायक पाऊल उचललं. मात्र हे कारण नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. पोलिसांनी विनोदचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तसेच याप्रकरणी अनेकांची चौकशी सुरू असून पोलीस आत्महत्येमागचं नेमकं कारण शोधत आहेत.

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद हा घरातील एकुलता एक मुलगा होता. त्याच्या वडिलांचं काही वर्षांपूर्वी निधन झालं होतं, तर त्याच्या बहिणीचं गेल्या वर्षीच लग्न झालं होतं. थंडीमध्ये अंगावर घेण्यासाठी जी शाल वापरली जाते. त्याच्या मदतीने त्याने गळफास घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. लग्नाआधी विनोद नाराज होता आणि त्यामुळेच तो बाहेर निघून गेल्याचं म्हटलं जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here