संत गाडगे बाबा बिचारमंच बहुऊद्देशीय संस्थेचा दिनदर्शिका लोकार्पन सोहळा संपन्न

कारंजा (तालुका प्रतिनिधी हाफीज खान) : कारंजातील समाजकार्यात अग्रेसर असणार्‍या संत गाडगे बाबा विचारमंच बहुऊद्देशीय संस्थेच्यावतीने दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आल्यायत. ज्याचा लोकार्पन सोहळा आज दि.२५ डिसेंबर रोजी मान्यवरांच्या ऊपस्थितीत पार पडला.

शहरातील संत गाडगे बाबा पुतळा परिसरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके यांची ऊपस्थिती होती, तर संत गाडगे बाबा पतसंस्थेचे अध्यक्ष विश्वनाथ राऊत व कारंजा शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार आधारसींग सोनोने तसेच विचार मंचचे अध्यक्ष संतोष शे. धोंगडे यांची ऊपस्थिती होती. तसेच कारंजा शहरातील प्रतिष्ठित नागरिक प्रसन्न पळसकर, नरेंद्र सेठ गोलेछा, शाम सवाई, संदेश जिंतूरकर, समीर देशपांडे, अनिल मस्के, संतू शहकार, अतुल खान, रा. ह. चांदूरकर, कुणाल महाजन, बंटी गाडगे, कादर खान, शंभू जिचंकर, अमोल अघम, रवी घाटे तसेच महेंद्र गुप्ता (पत्रकार) इत्यादी ची विशेष उपस्थिती लाभली.

sant-gadgebaba-dindarshika-karanja

मान्यवरांच्या हस्ते दिनदर्शिकेचे लोकार्पन करण्यात आले.संत गाडगे बाबा बहुऊद्देशीय संस्थेच्या आतपर्यंतच्या समाजकार्याचा लेखाजोखा या दिनदर्शिकेत मांडण्यात आलाय. यासाठी संस्थेतील उपाध्यक्ष राजेश चंदन , कोषाध्यक्ष चंद्रकांत भोपळे, सचिव रोहित देशमुख, कार्याध्यक्ष भारत हांडगे , संचालक सुरेश तिडके, सचिन कोळसकर, अजिक्य गूल्हाणे, प्रवीण तुपोने, राहुल देशमुख ,अशोक सोनेकर तसेच अजिक्य जवलेकर (युवा पत्रकार) यांनी विशेष परिश्रम घेतले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here