पूज्य साने गुरुजी जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास महापालिकेतर्फे महापौर सौ.महाजनांच्या हस्ते माल्यार्पणासह अभिवादन

जळगाव (क्राइम रिपोर्टर शाहिद खान) : शुक्रवारी, दि.२४ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी जळगाव शहर महानगरपालिका प्रशासनातर्फे आयोजित कार्यक्रमाप्रसंगी पूज्य साने गुरुजी यांच्या पुतळ्यास महापौर तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी महापालिकेचे उपायुक्त श्री.श्याम गोसावी, उपायुक्त श्री.पवन पाटील श्री.चंद्रकांत वानरे, महापौरांचे स्वीय सहाय्यक नितीन पटवे यांच्यासह मनपा कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here