आयएएस अधिकाऱ्याच्या मुलाने सहाव्या मजल्यावरून उडी घेऊन केली आत्महत्या

deadbody
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली (उपसंपादक जीवन षाकया) : १५ वर्षीय मुलाने इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. जेव्हा मुलाने हे भयानक पाऊल उचलले तेव्हा त्याचे आई-वडील मयूर विहार मार्केटमध्ये होते आणि मुलगा घरी एकटाच होता.

अपघातानंतर शेजाऱ्यांनी त्याला मॅक्स हॉस्पिटलमध्ये नेले, तेथे उपचारानंतर त्याला मृत घोषित करण्यात आले. ही घटना शनिवारी रात्री ८.३० च्या सुमारास घडली.

क्राईम टीम आणि एफएसएल टीमने घटनास्थळाची पाहणी केली आहे. आतापर्यंत कुठलाही गैरप्रकार झाल्याची भीती नसून पुढील तपास सुरू आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगा मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होता. गेल्या सप्टेंबरपासून त्याच्यावर उपचार सुरू होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here