यवत पोलिसांची कारवाई : पाटस परिसरातून ५० लाखाचा गांजा जप्त; १२ जणांना अटक

पुणे (जिल्हा संपादक सुरज घम) : जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पुणे-सोलापूर महामार्गावर पाटस परिसरात रविवारी (दि.२६) मध्यरात्री एकच्या सुमारास ३० लाख रुपयांचा १६७ किलो गांजा जप्त करुन ७८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली आहे. याप्रकरणी महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश येथील ७ पुरुष आणि ५ महिलांना अटक केली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी रविकुमार जागेश्वराव पुपल्ला (रा. झमिदागुमिल्ली वागुमिल्ली ता. जि. कृष्णा, आंध्र प्रदेश), रवि कॉटया अजमेरा (रा. विजयवाडा, ता. कंखीपाट जि.कृष्णा, आंध्र प्रदेश), उमेश खंडु थोरात (रा. मंचर, ता. आंबेगाव, पुणे), युवराज किसन पवार (रा. मुथळा ता. मुथळा, जि. बुलढाणा), उत्तम काळु चव्हाण (रा.करवंड ता. चिखली, जि. बुलढाणा), प्रकाश एन व्यंकेटेश्वराव (रा. विजयवाडा, ता. कृष्णा जि. कंळीवाळ, आंध्र प्रदेश), किसन शालीमार पवार (रा. मुथळा, ता. मुथळा, जि. बुलढाणा, महिला आरोपी रुक्मिणीबाई रुपराव पवार (रा. ढाकरखेड, ता. चिखली, जि. बुलढाणा), मिना युवराज पवार (रा. ढाकरखेड ता. चिखली जि. बुलढाणा), ममता उत्तम चव्हाण रा. करवंड ता. चिखली, जि. बुलढाणा), लालाबाई देवलाल चव्हाण (रा. चिखली ता. चिखली जि. बुलढाणा), ललिता हिरालाल पवार (रा. ढाकरखेड ता. चिखली, जि. बुलढाणा) या ७ पुरुष आणि ५ महिलांना ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मिलींद मोहीते, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण पवार, सहायक पोलीस निरीक्षक केशव वाबळे, पोलीस उपनिरीक्षक पदमराज गंपले, पोलीस नाईक गणेश सोनवणे, विशाल गजरे, विकास कापरे, पोलीस हवालदार जे.एम. भोसले, भानुदास बंडगर, रविंद्र गोसावी, मेघराज जगताप, महेंद्र चांदणे, नुतन जाधव, प्रमोद गायकवाड, सुजित जगताप, दिपक यादव, तात्याराम करे, गणेश मुटेकर, आनंद आहेर, धावडे, चालक सत्यवान जगताप, विजय आवळे, पोलीस मित्र रामा पवार, निखिल अवचट यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक नारायण पवार करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here